तरुण भारत

ब्रिटनने भारतासह अन्य देशांच्या मदतीने आखली 5-जी क्लब योजना

नवी दिल्ली :  ब्रिटन सरकार भारतासोबत अन्य 10 लोकशाही देशांसाठी 5 जी क्लब योजना उभारण्यासाठी अमेरिकेच्या संपर्कात आहे. यासंदर्भातील माहिती ब्रिटनच्या एका वृत्तपत्राच्या अहवालामधून दिली आहे. ब्रिटन सरकारने या अहवालात  चीनची कंपनी हुआईसोबत जोडलेल्या समस्येच्या बाबतचाही योग्य निर्णय घेतला जाणार असल्याचेही संकेत दिले आहेत. डी 10 क्लब या योजनेत जी 7 देशांमधील ब्रिटन, अमेरिका, इटली, जर्मनी, फ्रान्स, जपान आणि कॅनडासह ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया आणि भारताचा समावेश केला आहे. या समूहाचे एकत्रितपणे 5 जी उपकरणे आणि त्यांच्या संदर्भातील व्यवस्था उभारण्यासाठीची योजना आखण्यासाठी काम करण्यावर भर देण्यात येणार आहे आणि यातून चीनवरील अवलंबून असणारी 5 जी नेटवर्क संदर्भातील योजना कमी करण्यावर काम करण्यात येणार असल्याचेही स्थानिक वृत्तपत्र द टाईम्सच्या माहितीमधून सांगितले आहे. आम्हाच्या सोबतीला नवीन भागीदाराची आवश्यकता आहे. आम्ही जरी बाजारापेठेत नवीन असलो तरीही हुवावे कंपनीसोबत पुढे जाण्याचा निर्णय थांबविण्यासाठीच हा मार्ग निवडत असल्याचेही ब्रिटन सरकारने म्हटले आहे. युरोपात फक्त नोकिया आणि एरिक्सन याच कंपन्या 5 जी संदर्भातील उपकरणाची निर्मिती करु शकते.

Related Stories

प्रमुख बंदरांमधील उलाढालीत घसरण

Patil_p

भारतात 23 पासून ऍपलच्या ऑनलाईन स्टोअरचा प्रारंभ

Patil_p

भारत गॅसची बुकिंगसाठी व्हॉट्सअप सुविधा

Patil_p

आगामी वर्षात विक्रीत सुधारणा : ऑडी

Patil_p

‘रिलायन्स’चे समभाग उच्चांकी

Patil_p

ऍपल ऑनलाईन आयफोन खरेदीवर आता येणार मर्यादा

tarunbharat
error: Content is protected !!