तरुण भारत

जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार, जनावर बाजार 30 जूनपर्यत बंदच

मिलिंद शंभरकर यांचे नवीन आदेश

प्रतिनिधी / सोलापूर

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यामधील सर्व मॉल्स, आठवडी बाजार, जनावरांचे बाजार यामध्ये नागरिकांच्या होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव होण्याचा संभव धोका लक्षात घेता प्रतिबंधक उपाय योजनेचा एक भाग म्हणून सोलापूर जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार, जनावरांचा बाजार मॉल्स 30 जून रात्री बारा वाजेपर्यंत बंद राहील असे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोमवारी काढले आहे.

सोलापूर शहर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. गर्दीच्या ठिकाणी सदर विषाणूची लागण एका संक्रमित रुग्णाकडून अन्य व्यक्तीस त्याच्या संपर्कात आलेल्या होण्याची शक्यता विचारात घेता ज्या ठिकाणी गर्दी होते अशा ठिकाणी बंदी घालण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना एक भाग म्हणून नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यातील भरण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या आठवडी बाजार, जनावरांचा बाजार 30 जून पर्यत भरवण्यात मनाई आहे असे आदेश जिल्हाधिकारी शंभरकर यांनी काढले आहेत.

जिल्ह्यातील सर्व सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र बंद

सोलापूर जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात सेतू, ई सेतू व महा ई सेवा केंद्रावर विविध दाखले व इतर कामकाजासाठी मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची गर्दी होत असल्याने सदर कोरुना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार, सर्व सेवा केंद्र बंद पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवा असे आदेश जिल्हाधिकारी शंभरकर यांनी काढले आहेत. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.

Related Stories

महाराष्ट्राचे यंदाचे ‘जेन्डर बजेट’ महिला सबलीकरणासाठी प्रतिकूल : युनिसेफ

datta jadhav

‘विकिपीडिया- स्वस्थ ‘ द्वारे भारतीय भाषांतून आरोग्य ज्ञान : अभिषेक सूर्यवंशी

prashant_c

जिद्द आणि संघर्षाच्या जोरावर न्यूनगंडाच्या सीमारेषा ओलांडता येतात

pradnya p

दहावी-बारावी उत्तीर्णतेचा निकष 35 ऐवजी 25 टक्के?

triratna

हज यात्रेला जाणाऱ्या बांधवांसाठी इन्कम टॅक्स अट रद्द करा

triratna

पश्चिम महाराष्ट्रामध्ये वीजचोरी विरोधात मोहीम आणखी तीव्र करा : नाळे

pradnya p
error: Content is protected !!