तरुण भारत

महाराष्ट्रात यंदा पाऊस’फुल्ल’

पुणे / प्रतिनिधी

कोल्हापूर, सातारा, कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात यंदा सरासरीच्या 98 टक्के पावसाचा अंदाज साबळे मॉडेलने वर्तविला आहे.

Advertisements

ज्येष्ठ हवामानतज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी राज्याच्या विविध विभागनिहाय पावसाचा अंदाज वर्तविला आहे. हा अंदाज कमाल तापमान, सकाळ व दुपारची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी या निकषावर देण्यात आला आहे.

या अंदाजानुसार पश्चिम-मध्य महाराष्ट्रात 98 टक्के पावसाचा अंदाज आहे. यात कोल्हापूर, कराड, पाडेगाव, सोलापूर, राहुरी, पुणे येथे 98 टक्के इतका पाऊस पडेल. कोकणातही 98 टक्के इतक्याच पावसाची नोंद होईल. याशिवाय पश्चिम विदर्भ, मध्य विदर्भ, पूर्व विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र येथेही चांगल्या पावसाची म्हणजेच 98 टक्के पावसाची शक्यता आहे.

Related Stories

‘पर्वती चढणे’ स्पर्धा उत्साहात

prashant_c

जंगलातील 97 टक्के भागावर मानवी आक्रमण :अतुल धामणकर

prashant_c

इवल्याश्या काडेपेटय़ांचा दुर्मीळ खजिना खुला

prashant_c

नाशिकमधील ‘या’ गावाला आहे इरफान खानचे नाव

datta jadhav

मोहन जोशी, डॉ.अरूणा ढेरे यांना वाग्यज्ञ साहित्य – कला गौरव पुरस्कार

pradnya p

महाराष्ट्र केसरीची गदा यंदा नव्या मल्लवीराकडे

prashant_c
error: Content is protected !!