तरुण भारत

महाराष्ट्रात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण साडेतीन पटीने वाढले

ऑनलाईन टीम / मुंबई : 

राज्यामध्ये कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मार्चच्या तुलनेत मे मध्ये साडेतीन पटीने वाढून ४३.३५ टक्के झाले आहे. मागील तीन महिन्यांची आकडेवारी पाहता मे मध्ये सर्वाधिक रुग्ण बरे झाले आहेत. यासोबतच राज्यातील रुग्ण दुपटीचा कालावधी (डबलींग रेट) ११ वरून १७.५ दिवसांवर गेला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

Advertisements

टोपे म्हणाले, मार्चच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील पहिले रुग्ण आढळल्यानंतर ३१ मार्च अखेर राज्यात ३०२ रुग्ण होते. त्यातील ३९ रुग्ण बरे झाले. म्हणजे मार्च महिन्यात कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण १२.९१ टक्के एवढे होते. एप्रिल अखेर राज्यात १० हजार ४९८ रुग्ण होते. त्यातील १७७३ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. एप्रिल महिन्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण १६. ८८ टक्के होते.
३१ मे अखेर राज्यात ६७ हजार ६५५ रुग्णांपैकी २९ हजार ३२९ रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे मे अखेरीस राज्याचा रिकव्हरी रेट मार्चच्या तुलनेत सुमारे साडे तीन पटीने वाढत ४३.३५ टक्के एवढा झाला आहे.

राज्य शासनाने हाती घेतलेल्या उपाययोजना, लागू केलेले लॉकडाऊन, डॉक्टर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या परिश्रमांमुळे त्यासोबतच केंद्र शासनाने सुधारीत डिस्चार्ज पॉलिसी जाहीर केल्यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तर एकाच दिवशी ८००० रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचा विक्रम नोंदविला गेला, असेही टोपे यांनी सांगितले. 

Related Stories

महिलांवरील अत्याचार, बंद मंदिरांच्या विरोधात भाजपचे महाराष्ट्रात आंदोलन

Rohan_P

मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढ्याला मोठा धक्का – अशोक चव्हाण

Abhijeet Shinde

उत्तराखंड महाप्रलय : 203 जण बेपत्ता; 11 मृतदेह हाती

datta jadhav

जनआशीर्वाद यात्रेत राजनाथ सिंह यांचा नारायण राणेंना फोन, म्हणाले…

Abhijeet Shinde

पोलिसांच्या सौम्य लाठीचार्जनंतर वांद्रे स्टेशनबाहेरील मजुरांची गर्दी ओसरली

prashant_c

कमला हॅरिस उपराष्ट्रपती होऊ शकतात, तर सोनिया गांधी पंतप्रधान का होऊ शकत नाहीत?; केंद्रीय मंत्र्यांचा सवाल

Abhijeet Shinde
error: Content is protected !!