तरुण भारत

सातारकरांसाठी समाधानकारक सोमवार

दिवसभरात एकूण 40 कोरोनामुक्त, 22 जण पॉझिटिव्ह

प्रतिनिधी/सातारा

राज्यात मे महिन्यात कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण साडे तीन पटीने वाढलेले असताना सातारा जिल्हय़ातही कोरोनाशी जोरकसपणे सुरू असलेल्या लढय़ास यश येत असल्याचे दिसत आहे. जिल्हय़ात 40 जणांनी कोरोनावर मात केल्याने 1 जून हा सोमवारचा दिवस समाधानकारक व दिलासा देणारा ठरला. कराडमधील कृष्णा, सहय़ाद्रि आणि पार्लेतून एकुण 29 कोरोनामुक्त रूग्णांना टाळय़ांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. तर रायगाव 2, खावली 4 व जिल्हा रुग्णालय येथून 5 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

यात जिल्हय़ातील विविध गावच्या रूग्णांचा समावेश असल्याने अनेक ठिकाणच्या साखळय़ा तुटण्यास मदत होणार आहे. दरम्यान, आज, सोमवारी सकाळी 5 आणि सायंकाळी 17 असे एकुण 22 जणांचे अहवाल बाधित आले आहेत.

‘कृष्णा’च्या सेंच्युरीला जिल्हाधिकाऱयांची उपस्थिती

Advertisements

कृष्णा हॉस्पिटलमधून आज कोरोनामुक्त झालेल्या 19 रूग्णांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. आत्तापर्यंत कृष्णा हॉस्पिटलमधून कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांचा आकडा 100 झाला आहे. कोरोना लढय़ाचे सेनापती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी स्वत: कृष्णामध्ये उपस्थित राहात रूग्णांचे स्वागत केले. कृष्णाच्या कोविड योद्धय़ांचे कौतुकही केले. 18 एप्रिलला येथे तांबवेचा रूग्ण कोरोनामुक्त झाला होता. त्यानंतर अवघ्या 43 दिवसांत येथे कोरानामुक्तांनी शतक गाठले. म्हणजेच जवळजवळ दिवसाला दोन याप्रमाणे कृष्णाने रिकव्हरी केल्याचे दिसत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱयांनी डॉ. सुरेश भोसले आणि कृष्णा हॉस्पिटलच्या सर्व टीमचे विशेष अभिनंदन केले.

आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या रूग्णांमध्ये गावडेवाडी येथील 20 वर्षीय युवक, उंब्रज येथील 40 वर्षीय पुरूष, म्हासोली येथील 37 वर्षीय महिला, 15 वर्षीय मुलगी, शिरळ-पाटण येथील 26 वर्षीय महिला, 25 वर्षीय महिला, भरेवाडी-पाटण येथील 36 वर्षीय पुरूष, बनपुरी-पाटण येथील 31 वर्षीय महिला, 40 वर्षीय पुरूष, 19 वर्षीय युवक, 48 वर्षीय पुरूष, 10 वर्षीय मुलगा, 8 वर्षीय मुलगा, शितपवाडी-पाटण येथील 40 वर्षीय पुरूष, 14 वर्षीय मुलगा, 19 वर्षीय युवक, ढेबेवाडी फाटा येथील 23 वर्षीय पुरूष, 44 वर्षीय महिला, 18 वर्षीय मुलगी अशा एकूण 19 जणांचा समावेश आहे.

सहय़ाद्रि व पार्लेतून प्रत्येकी 5 म्हणजे 10 जण मुक्त

कराडच्या सहय़ाद्रि हॉस्पिटलमधून कालपर्यंत 31 जण कोरोनामुक्त झाले होते. सोमवारी येथे आणखी पाच जणांना डिस्चार्ज देण्यात आला. यात खटाव तालुक्यातील गारवडीची 21 वर्षीय महिला, मांजरवाडीचा 66 वर्षीय पुरुष,मायणीचा 64 वर्षीय पुरुष, जावळी तालुक्यातील वारूशी 48 वर्षीय महिला, कराड तालुक्यातील वानरवाडी येथील 40 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. तर पार्ले येथील कोरोना केअर सेंटरमध्ये लक्षणे नसणाऱया रूग्णांना ठेवले होते. तेथून म्हसवडचे तीन व वानरवाडीच्या दोन रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सातारा, रायगाव, खावलीतून 11 मुक्त

दरम्यान, क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असणारे 5, कोविड सेंटर रायगाव येथील 2 व खावली येथील 4 असे एकुण 11 कोरोनामुक्त रूग्ण आज टाळय़ांच्या गजरात घरी सोडण्यात आले. कराडचे 29 व सातारचे 11 अशी जिल्हय़ाने कोरोनामुक्तीची आजची झेप 40 वर घेतली आहे.

सकाळच्या अहवालात पाच पॉझिटिव्ह

रविवारी रात्री पुण्याचा अहवाल आला नव्हता. त्यामुळे काल रूग्णांची वाढ झाली नव्हती. सोमवारी सकाळी हा अहवाल आला. त्यात पाच जण बाधित निघाले. यात पाटण तालुका नवसरवाडी (60 वर्षीय पुरुष), वाई तालुका वोव्हाळी (42 वर्षीय पुरुष) व जांभळी (11 वर्षीय मुलगी), महाबळेश्वर तालुका कोट्रोशी (10 वर्षीय मुलगी) व हरचंदी (63 वर्षीय पुरुष) असे एकुण 5 जण पॉझिटिव्ह आले.

रात्रीच्या अहवालात 17 बाधित

सातारा जिह्यातील विविध कोरोना केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालय येथे अनुमानित म्हणून भरती असलेल्या 17 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. बाधित रुग्णांमध्ये फलटण बरड येथील 55 वर्षीय महिला, वडाळे येथील 35 वर्षीय पुरुष. जावळी कावडी येथील 52 वर्षीय महिला, कळकोशी येथील 41 वर्षीय पुरुष, केळघर (सोळशी) येथील 39 वर्षीय महिला. कराड विंग येथील 43 वर्षीय महिला, 19 वर्षीय तरुण.
पाटण काळेवाडी येथील 21 वर्षीय महिला, नवसरेवाडी 25 व 22 वर्षीय पुरुष. खंडाळा शिरवळ येथील 72 वर्षीय महिला. खटाव अंभेरी येथील 3 व 6 वर्षीय बालिका, 29 वर्षीय पुरुष. महाबळेश्वर हरचंदी येथील 53 वर्षीय महिला, गोरोशी येथील 72 वर्षीय महिला. वाई ग्रामीण रुग्णालयातील 24 वर्षीय महिला आरोग्य सेवक यांचा समावेश आहे.

मृत्यू पश्चात तिघांचे रिपोर्ट तपासणीला

मुंबईवरुन आलेल्या व घरीच क्वॉरंटाईन असेलल्या बोपेगाव (ता. वाई) येथील रक्त दाबाचा त्रास असलेल्या 85 वर्षीय महिला, सारीचा आजार असलेली गिरवी (ता. फलटण) येथील 65 वर्षीय महिला
तर 15 वर्षापूर्वी कॅन्सरने आजारी असलेला 29 मे रोजी मुंबई येथून आलेला 52 वर्षीय पुरुष अशा 3 जणांचा मृत्यू झाला असून, मृत्यू पश्चात त्यांच्या घशातील स्त्रावाचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली.

219 जणांचे नमुने तपासणीला

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे 17, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथे 52, कृष्णा कॉजेल कराड येथे 42, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथे 14, ग्रामीण रुग्णालय वाई येथे 6, ग्रामीण रुग्णालय खंडाळा येथे 29, ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथे 33 व रायगाव येथे 26 असे एकूण 219 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी. सी. एस. पुणे व कृष्णा मेडिकल यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यामध्ये आज तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 3 मृत व्यक्तिंच्या घशातील स्त्रावांचाही समावेश असल्याची माहिती डॉ. गडीकर यांनी दिली.

जिल्हय़ात सोमवारपर्यंत

एकुण कोरोनाबाधित : 538
एकुण कोरोनामुक्त: 202
बळी : 21
जिल्हय़ात ऍक्टीव्ह रूग्ण : 315

सोमवारी

एकुण कोरोनाबाधित : 22
कोरोनामुक्त : 40
बळी 0
दिवसभरात निगेटिव्ह : 237

Related Stories

सातारा नगरपालिकेचे ‘वसुंधरा अभियान’ फक्त ट्विटरवरच

datta jadhav

राष्ट्रीय महिला कुस्ती निवड चाचणीत कोल्हापूचा दबदबा

Patil_p

नेपाळमध्ये भारतीय न्यूज चॅनेलच्या प्रसारणावर बंदी

datta jadhav

कोल्हापूर : सावे येथे तीन वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार, संशयितास अटक

Abhijeet Shinde

शाहूपुरी पाणी योजना लवकर कार्यान्वित करा

Patil_p

शिवसेनाप्रमुख देशाचे मार्गदर्शक

Abhijeet Shinde
error: Content is protected !!