तरुण भारत

शुभमंगल झाले, आता अपत्याचीही प्रतीक्षा…

हार्दिक पंडय़ाचा चाहत्यांना सुखद धक्का, सर्बियन मॉडेल-अभिनेत्री नतासाशी विवाहबद्ध झाल्याचा गौप्यस्फोट

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंडय़ाने रविवारी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन नतासा स्टॅन्कोव्हिक या सर्बियन मॉडेल-अभिनेत्रीशी विवाह झाल्याची आणि नतासा गर्भवती असून आपण अपत्याच्या प्रतीक्षेत असल्याची घोषणा करत चाहत्यांना सुखद आश्चर्याचा धक्का दिला. पंडय़ाने यावेळी आपल्या विवाहात टिपलेले एक छायाचित्रही शेअर केले आहे.

या छायाचित्रात विवाहसोहळय़ात दोघांनीही वरमाला घातली आहे. या वर्षाच्या प्रारंभीच पंडय़ाने नतासाशी आपला वाङ्निश्चय झाल्याचे जाहीर केले होते. त्या सोहळय़ाप्रमाणेच आता विवाहाबद्दलही त्याने अगदी अंतिम क्षणापर्यंत पुरेपूर गुप्तता पाळल्याचे स्पष्ट झाले. पंडय़ाने रविवारी इन्स्टाग्रामवरुन ही सुवार्ता दिली.

‘आम्हा दोघांची वाटचाल उत्तम राहिली आणि यापुढेही ती आणखी सरस असेल, याची आम्हाला खात्री आहे. नव्या सदस्याची आम्हाला आतापासूनच ओढ लागली आहे. आयुष्याच्या या नव्या पर्वात पहिले पाऊल टाकताना आम्ही रोमांचित झालो आहोत आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वाद व शुभेच्छांची आम्हाला आवश्यकता आहे’, असे हार्दिक पंडय़ा इन्स्टाग्रामवरील आपल्या पोस्टमध्ये म्हणाला.

26 वर्षीय पंडय़ा पाठीच्या शस्त्रक्रियेमुळे मागील सप्टेंबरपासून भारतीय संघातून खेळलेला नाही. मात्र, यंदा मार्चमध्ये डीवाय पाटील टी-20 स्पर्धेत सलग दोन शतके झळकावत व एकदा डावात पाच बळी घेत त्याने आपला फॉर्म दाखवून दिला आहे.

Related Stories

फातोडर्य़ात आज हैदराबाद एफसी व बेंगलोर यांच्यात लढत

Patil_p

रामकुमार उपांत्य फेरीत

Patil_p

दुसऱया कसोटीतून शकीब अल हसन बाहेर

Patil_p

टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत थेंगवेलू भारताचा ध्वजधारक

Patil_p

भारत-ओमान यांच्यात आज फुटबॉल सामना

Patil_p

IndvsNZ : टीम इंडियाची प्रजासत्ताक दिनी विजयी भेट

triratna
error: Content is protected !!