तरुण भारत

डोक्यात दगड घालून युवकाचा खून

प्रतिनिधी/ सातारा

देगाव (ता. जि. सातारा) हद्दीत देगाव ते शिवचा ओढा नावाच्या शिवारातील ओढय़ात युवकाचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना सोमवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. सकाळी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या लोकांना  मृतदेह आढळून आला. युवकाचे अंदाजे वय 25 असून तोंडावर दगड मारल्याने युवकाची ओळख पटविण्यात अडचणी येत होत्या. घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस पथके तपास करीत आहेत.

Advertisements

  याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोमवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांना देगाव ते शिवचा ओढा नावाच्या शिवारातील ओढय़ात एका युवकाचा मृतदेह आढळून आला. याबाबत नागरिकांनी पोलिसांना खबर दिली. घटनास्थळी सातारा तालुका पोलिसांनी धाव घेत पहाणी केली. यावेळी एका अंदाजे 25 वर्षाच्या युवकाचा डोक्यात दगड घालून खून झाल्याचे निदर्शनास आले. घटनेचा पंचनामा करुन तत्काळ मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येथील जिल्हा शासकीय रुग्णालायत पाठविण्यात आला. युवकाच्या डोक्यात दगड घातल्याने चेहरा छिन्नविछिन्न झाला होता. त्यामुळे मृतदेहाची ओळख उशीरापर्यंत पटली नव्हती.

  उशिरापर्यंत ओळख पटली नसल्याने पोलीस पथके तपासासाठी परिसरात रवाना झाली होती. यावेळी परिसरात राहणाऱया परप्रांतिय तसेच इतर ठिकाणी पोलिसांनी विचापुस केली असता कोणतीही माहिती उशिरापर्यंत हाती लागली नव्हती. घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे.

Related Stories

मुदाळच्या कृषिकन्यांनी बनवले भाजीपाला टिकवणारे शितगृह

Abhijeet Shinde

‘त्या’ गावगुंडांना अद्दल घडवा

Abhijeet Shinde

गौण खनिज 26 खाणपट्टय़ांचे होणार लिलाव

Amit Kulkarni

सातारा : ‘महिला’ ही गुन्हेगारीत आघाडीवर

Abhijeet Shinde

आईनेच केला नवजात बालिकेचा गळा आवळून खून

Abhijeet Shinde

जिल्हाधिकाऱयांची पत्रकार परिषद रद्द

Amit Kulkarni
error: Content is protected !!