तरुण भारत

साखळी नगराध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव

    डिचोली / प्रतिनिधी

   साखळी पालिकेचे नगराध्यक्ष धर्मेश सागलानी यांच्या विरोधात सात नगरसेवकांनी अविश्वास ठरावाची नोटीस बजावली असून त्याच्या प्रति पालिका प्रशासन तसेच संबंधित खात्यांना सादर करण्यात आल्या आहेत. गेल्या सात वर्षांच्या नगराध्यक्ष धर्मेश सगलानी यांची सत्ता खाली खेचून साखळी नगरपालिकेवर आपली हुकुमत सिध्द करण्यासाठी साखळी भाजपने पावले उचलली आहेत, हे यावरून दिसून येत आहे.

   या अविश्वास ठरावावर  यशवंत माडकर, शुभदा सावईकर, रश्मी देसाई, ब्राह्मनंद देसाई, आनंद काणेकर, दयानंद बोर्येकर व राजेश सावळ या सात नगरसेवकांच्या सह्या आहेत.

  आपल्या व्यवसायात व्यस्त राहताना पालिकेसाठी वेळ न देणे, सदस्यांना विश्वासात घेतले जात नाही, सरकारी यंत्रणेला विश्वासात घेतले जात नाहीत, त्याचा परिणाम कामकाजावर होतो. अशी कारणे या अविश्वास ठरावावर नमूद करण्यात आल्याचे दयानंद बोर्येकर यांनी सांगितले.

  नव्या पालिका इमारतीचे लोकार्पण होऊन  चारच दिवस झालेले असताना हा अविश्वास ठराव दाखल करण्यात आला असून भाजपने आपली सत्ता निर्माण करण्यासाठी पाऊले उचलली आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून साखळी नगराध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव आणण्याचे राजकारण धुमसत होते. मात्र त्य स मुहूर्त सापडत नव्हता. नवीन पालिका इमारतीच्या उदघाटनानंतर भाजपने या राजकारणात आपले यशस्वी पाऊल टाकला आहे. 2013 साली साखळी नगरपालिका मंडळ स्थापन झाल्यानंतर अवघ्या 46 दिवसांनी सत्तांतर घडवून आणत धर्माचे श सगलानी यांंनी नगराध्यक्षपदाची खुर्ची काबीज केली होती. ती आजपर्यंत आपल्याकडे राखण्यात त्यांनी यश मिळविले होते.

  मात्र साखळीचे आमदार डॉ. प्रमोद सावंत हे मुख्यमंत्री बनल्यानंतर साखळीतील नगरपालिकेवर भाजपची सत्ता स्थापन करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू करण्यात आल्या होत्या. परंतु त्यात यश येत नव्हते. मात्र आता भाजपने सत्तांतर घडविण्याच्याक्ष दृष्टीने टाकलेले फासे प्रथमदर्शनी योग्य मार्गी पडले असून नगराध्यक्ष धर्मेश सगलानी यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात यश मिळविले आहे. आता सदर ठराव संमत होऊन नवीन नगराध्यक्ष खुर्चीवर स्थानापन्न होईपर्यंत बऱयाच राजकीय घडामोडीं®ाा अनुभव साखळीवासीयांना घेण्याची संधी प्राप्त होणार आहे.

Related Stories

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी गोव्यातही व्हावी

Patil_p

दिवसभरात कोरोनाचे दोन बळी

Omkar B

सांखळीत 21कोरोना रूग्ण सापडले ग्रामीण भाग कोरोनाच्या विळख्यात

Patil_p

कोरोना लसीकरणासाठी आठ इस्पितळे

Patil_p

डिचोली तालुक्मयात दोन तलाठी पॉझिटिव्ह

Patil_p

जपानमध्ये अडकलेले 50 गोवेकर भारताकडे रवाना

tarunbharat
error: Content is protected !!