तरुण भारत

गटारे, नाल्यांच्या सफाईसाठी माजी नगरसेवकांचा पुढाकार

स्वतःचे कामगार, जेसीबी वापरून सफाई : मडगाव पालिकेची कार्यपद्धती उघडी

प्रतिनिधी / मडगाव

मडगाव पालिका क्षेत्रातील मान्सूनपूर्व कामे करण्यासाठी मडगाव नगरपालिकेने कामगारांची नियुक्ती न करताच निविदा काढल्या व सदर निविदांत त्रुटी असल्याने त्या पालिका संचालकांनी स्थगित ठेवण्यास सांगितले आहे. मात्र आता काही माजी नगरसेवक पुढे सरसावले असून स्वतःचे कामगार व जेसीबी वापरून गटारे व नाल्यांच्या सफाईसाठी त्यांनी पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे.

माजी नगरसेविका बबिता नाईक आणि माजी नगरसेवक सदानंद नाईक या दांपत्याने गटारे व नाले जेसीबीचा वापर करून साफ केले आहेत. अमृतनगर येथील साळगावकर यांच्या घरानजीकचा मोठा नाला उपसण्यात आला नसल्याने येथे पावसाळय़ात समस्या निर्माण होण्याची शक्मयता स्थानिकानी व्यक्त केल्याने आपण आपले जेसीबी यंत्र वापरात आणून सदर नाल्यातील गाळ उपसल्याची माहिती बबिता नाईक यांनी दिली.

याखेरीज प्रभाग 6-मधील काही गटारांची स्वतःचे कामगार वापरून साफसफाई केली. तसेच आगाळी व अमृतनगर येथील काही झाडे वाढून ती घरमालकांसाठी धोकादायक बनल्याने त्यांनी आपल्याकडे संपर्क साधला असता अशा झाडांच्या फांद्यांची छाटणी आपण कामगार वापरून करून दिल्याचे नाईक यांनी नजरेस आणून दिले.

आमदारांनी पुरविले कामगार

मडगावच्या शहरी भागात स्टेशन रोडवर रस्त्याच्या बाजूला घर असलेल्या ऍड. नॉर्टन फर्नांडिस यांनी घरासमोरील गटाराची साफसफाई करण्यासाठी वारंवार पालिकेकडे साकडे घातले, तरी सफाई होत नसल्याने शेवटी स्थानिक आमदार दिगंबर कामत यांच्या नजरेस हा प्रकार त्यांनी आणून दिला. कामत यांनी पुरविलेल्या कामगारांना घेऊन ऍड. फर्नांडिस यांनी स्वतः देखरेख ठेवून गटारांची सफाई करून घेतली. या प्रकारांमुळे मडगाव पालिकेची कार्यपद्धती उघडी पडली आहे. पालिका प्रशासन व नगरसेवकांना मान्सूनपूर्व कामे मार्गी लावण्यास अपयश आल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

Related Stories

दिल्ली-मडगाव रेल्वे 15 पासून धावणार

Omkar B

कर्नाटकातील वाहनांना पोळे चेकनाक्यावरून प्रवेश देऊ नये

Omkar B

भाजपकडून लोकशाहीचा खून

Amit Kulkarni

गुरूवारी दाबोळी विमानतळावर 96 प्रवासी दाखल

Patil_p

उसकई येथे एक्वेरीक सीटच्या कंपनीला आग लागून 75 लाखांचे नुकसान

Omkar B

डॅन, किओना, आवेलीनो, पर्ल, आदर्शला सुवर्णपदक

Amit Kulkarni
error: Content is protected !!