तरुण भारत

घरासमोर ठेवलेल्या दोन वाहनांना आग, 17 लाखांचे नुकसान

दापट – माशे येथे घडलेला प्रकार

प्रतिनिधी / काणकोण

Advertisements

मडगाव-कारवार मार्गावरील माशे-दापट या ठिकाणी लुशान फर्नांडिस यांनी आपल्या घरासमोर पार्क करून ठेवलेल्या स्कॉर्पियो आणि फियाट अशा दोन वाहनांना आग लागण्याचा प्रकार 1 रोजी सायंकाळी 4 च्या दरम्यान घडला. या आगीत दोन्ही वाहने जळून गेली असून वाहनमालक फर्नांडिस याला 17 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

विशेष म्हणजे दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला साधारणपणे 8 मीटर अंतरावर पार्क करून ठेवण्यात आली होती. आगीची माहिती मिळताच काणकोण अग्निशामक दलाचे प्रमुख रवींद्रनाथ पेडणेकर आणि त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत दोन्ही वाहने जळून गेली होती. काणकोणच्या पोलिसांनी पंचनामा केला आहे. या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र हा घातपाताचा प्रकार असण्याचा संभवही व्यक्त करण्यात येत आहे. काणकोणचे पोलीस निरीक्षक तुकाराम चव्हाण पुढील तपास करत आहेत.

Related Stories

दुसऱया लाटेत देशाने गमावले 513 डॉक्टर्स

Amit Kulkarni

रस्ता हॉटमिक्स डांबरीकरणाच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी काँग्रेस-भाजपमध्ये चढाओढ

Amit Kulkarni

वास्कोत मंत्री आमदारांच्या उपस्थितीत निर्जंतुकीरणाला प्रारंभ

Patil_p

फातोडर्य़ात आज होणार बेंगलोरची लढत एटीके मोहन बागानशी

Amit Kulkarni

आय-लीगमध्ये आज चर्चिल ब्रदर्सचा मुकाबला पंजाब क्लबशी

Amit Kulkarni

आजपासून खासगी बसगाडय़ा, सरकारी कार्यालये सुरू

Omkar B
error: Content is protected !!