तरुण भारत

भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल उत्पादक देश

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल उत्पादक देश आहे. मागील 5 वर्षात देशात 200 हून अधिक मोबाईल निर्मिती केंद्र सुरू झाल्याची माहिती कायदा आणि न्याय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली.

Advertisements

देशात सन 2014 च्या तुलनेत मोबाईल निर्मिती करणार्‍या कारखान्यांमध्ये सन 2019 मध्ये 200 टक्के वाढ झाली. यातील आलेखानुसार, 2019-20 या आर्थिक वर्षात 3 कोटी 30 लाख मोबाईल्सची निर्मिती करण्यात आली. या मोबाईल हॅण्डसेट्सची एकूण किंमत सुमारे 3 कोटी डॉलर्स इतकी आहे.

सन 2014 मध्ये मोबाईल निर्मिती करणारे केवळ 2 युनिट भारतात होते. तेव्हा 60 मिलियन स्मार्टफोन तयार करण्यात आले होते. त्या फोनची किंमत 3 बिलियन डॉलर्स एवढी होती. दरम्यान, इलेक्ट्रॉनिक कंपन्यांना जगातील दुसर्‍या मोठ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्मिती केंद्राचा भाग होण्याची संधी उपलब्ध होत असल्याने, इलेक्ट्रॉनिक यंत्रणा प्रारूप आणि निर्मिती क्षेत्रातील एक मोठे केंद्र म्हणून भारताचा विचार त्यांनी करावा, असे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने म्हटले आहे.

Related Stories

UPSC NDA Exam १८ एप्रिलला ; परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी

triratna

दिल्लीत आज दिवसभरात आढळले 674 नवे कोरोना रुग्ण; 12 मृत्यू

pradnya p

कर्नाटकात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट, तर ५२ हजाराहून अधिक रुग्णांची कोरोनावर मात

Shankar_P

पुड्डुचेरीत भाजपचे घोषणापत्र सादर

Patil_p

धोका वाढला : एका दिवसात 281 पोलिसांना कोरोनाची बाधा, 4 मृत्यू

pradnya p

कोल्हापूर शहरातील दूध विक्री उद्यापासून बंद

Shankar_P
error: Content is protected !!