तरुण भारत

दुचाकी-टॅम्पोच्या धडकेत 5 जण जखमी

प्रतिनिधी/ रत्नागिरी

मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा पेट्रोलपंप येथे दुचाकी-टॅम्पोमध्ये झालेल्या अपघातात 5 जण जखमी झाल़े ही घटना मंगळवारी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास घडल़ी जखमींना रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आह़े

Advertisements

दुचाकीवरील अरसलान अल्ताफ मुकादम (14) व इब्राहिम नेवरेकर (51, ऱा लांजा तेलीवाडी) तर टॅम्पोमधील तेजश्री किशोर सोने (24), किशोर अरूण सोने (31) व रूकमुद्दीन बादशहा शेख (25, ऱा मानखूर्द नवीमुंबई) अशी जखमींची नावे आहेत़ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार टॅम्पोमधील सर्व जण हे मुंबई येथून कुडाळ सिंधुदुर्ग कडे प्रवास करत होते तर नेवरेकर हे लांजाच्या दिशेने जात होत़े

दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास हातखंबा पेट्रोलपंप येथे टॅम्पोने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल़ी या अपघातात दुचाकीवरील नेवरेकर व मुकादत हे खाली कोसळून जखमी झाले तर टॅम्पोदेखील रस्त्यावर उलटल़ा या अपघातात दुचाकीवरील दोघे तर टॅम्पोमधील 3 जण जखमी झाल़े

Related Stories

चिपळुणात 35 ब्रास वाळू जप्त

Patil_p

शांताई आणि क्रीश फौंडेशन तर्फे डॉ.भूषण सुतार यांचा सत्कार

Rohan_P

तवंदी घाटात कंटेनर पलटी

Amit Kulkarni

शिवपुतळा चौथरा कामाचा बाळेकुंद्री खुर्द येथे शुभारंभ

Amit Kulkarni

सदाशिवनगरमधील गटारी झाल्या नामशेष

Amit Kulkarni

गुप्त माहिती मिळविण्यासंदर्भात पोलिसांनी गिरवले धडे

Rohan_P
error: Content is protected !!