तरुण भारत

एक लस दुसऱया टप्प्यात : दुसरी 99 टक्के प्रभावी

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर दिलासादायक वृत्त : जगभरात प्रयत्न गतिमान

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

कोरोना विषाणूवरील लसीच्या संशोधनादरम्यान चांगले वृत्त समोर आले आहे. अमेरिकेत एका कंपनीची चाचणी दुसऱया टप्प्यात पोहोचली आहे. पुढील वर्षाच्या प्रारंभी ही लस बाजारात उपलब्ध होऊ शकते. चीनमध्ये आतापर्यंत 5 लसींच्या मानवांवर चाचण्या करण्यात आल्या आहेत. सिनोवॅक बायोटेक या चिनी कंपनीने स्वतःची लस 99 टक्के प्रभावी असल्याचा दावा केला आहे. रशियाच्या लसीचे क्लीनिकल ट्रायल दोन आठवडय़ांमध्ये सुरू होणार आहे. रशियात पुढील आठवडय़ापासून कोविड-19 च्या रुग्णांच्या उपचाराकरता अविफाविर या औषधाचा वापर होणार आहे.

120 लसींकरता संशोधन

जगभरात कोरोना विषाणूवरील लस निर्माण करण्यासाठी शर्यत सुरू आहे. सुमारे 120 लसींवर काम सुरू असून किमान 10 लसी मानवावरील चाचण्यांपर्यंत पोहोचल्या आहेत. चीनची कॅनसिनो ऍडिनोव्हायरस व्हॅक्सिन, ऑक्सफोर्ड विद्यापीठाची ऍडिनोव्हायरस व्हॅक्सिन, मॉडर्नाची एमआरएनए व्हॅक्सिन आणि नोवावॅक्स यांनी जागतिक अपेक्षा वाढविली आहे. याचबरोबर अनेक लसींचे प्रारंभिक निष्कर्ष अत्यंत प्रभावी राहिले आहेत.

चीनही सक्रीय

चीनमध्ये 5 लसींची चाचणी मानवावर केली जात आहे. बीजिंग इन्स्टिटय़ूट ऑफ बायोलॉजिकल प्रॉडक्ट्स अँड चीन नॅशनल बायोटेक ग्रूप कंपनीच्या संयुक्त लसीने दुसऱया टप्प्यातील चाचणी पूर्ण केली आहे. ही लस विषाणूच्या एका मृत आवृत्तीचा वापर करते. ही लस वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या प्रारंभी बाजारात उपलब्ध होऊ शकते. कंपनीकडे दरवर्षी 10-125 कोटी लसींची निर्मिती करण्याची क्षमता आहे.

अमेरिकेची कंपनी आघाडीवर

मॉडर्नाच्या लसीने आशेचा किरण निर्माण केला आहे. दुसऱया टप्प्यात विविध वयोगटाच्या 500 तंदुरुस्त लोकांना पहिला डोस देण्यात आला आहे. कंपनीने सार्स-कोव्ह-2 विषाणूच्या जेनेटिक मटेरियल पार्टचा वापर करत एमआरएनए लस तयार केली आहे. ही लस मानवी शरीरात विषाणूसंबंधी प्रतिकारशक्ती जागृत करणार आहे.

Related Stories

संरक्षण मंत्रालयाच्या नव्या कार्यालयाचे आज उद्घाटन

Patil_p

प. बंगाल आणि केरळमध्ये एनआयएचे छापे; अल कायदाच्या 9 संशयित दहशतवाद्यांना अटक

Rohan_P

विशाल टेक्स्टाईल पार्कला केंद्राची संमती

Patil_p

राफेल करारावर ‘कॅग’वर्षाव

Patil_p

काश्मिरी विस्थापितांना परत मिळणार वडिलोपार्जित संपत्ती

Patil_p

आसाम रायफल्सने घेतला मणिपूर हल्ल्याचा बदला

datta jadhav
error: Content is protected !!