तरुण भारत

मोहम्मद शमीची मजुरांना मदत

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

कोरोना महामारी संकटामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू असून विविध राज्यातील स्थलांतरीत कामगार आपल्या घरी जाण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. अशा कामगारांना भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने आहार आणि पाणी याचे वाटप करून मदतीचा हात पुढे केला आहे.

Advertisements

उत्तरप्रदेशमधील सहासपूर येथे शमीचे निवासस्थान असून या परिसरात स्थलांतरीत कामगारासाठी उघडण्यात आलेल्या मदत केंद्रामध्ये शमीने आहार (अन्न) व पाणी यांचे वाटप केले. भारतीय क्रिकेट मंडळाने शमी मजुरांसाठी देत असलेल्या मदतीचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. बाहेरील राज्यातील कामगारांना स्वगृही जाण्यासाठी बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. भारतामध्ये कोरोना महामारीने सुमारे 5000 लोकांचा बळी घेतला असून सुमारे दोन लाख लोकांना याची लागण झाली आहे.

Related Stories

वानखेडे स्टेडियमवर रात्री 8 नंतर सरावाची मुभा

Patil_p

अमेरिकेची जेनीफर ब्रॅडी अजिंक्य

Patil_p

क्रोएशियाचा कोरिक दुसऱया फेरीत

Patil_p

‘स्लो स्टार्टर्स’ मुंबई आज केकेआरविरुद्ध लढणार

Patil_p

ऋतुजा-इमेली दुहेरीतील विजेते

Patil_p

केकेआरला तो पराभव महागात पडणार?

Patil_p
error: Content is protected !!