तरुण भारत

विद्यार्थ्यांची सुरक्षा घेऊनच दहावीच्या परीक्षा होणार

शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांची माहिती, शाळा सुरू करण्याबाबत चाचपणी सुरू

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

कर्नाटकात 25 जुन ते 4 जुलै दरम्यान दहावीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत.  यावर्षी कोरोनाचा धोका असल्याने शिक्षण विभागाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. विद्यार्थ्यांना सॅनिटायझर, सोशल डिस्टंन्सिंग ठेवूनच परीक्षा द्यावी लागणार आहे. परीक्षा होईपर्यंत एखादा भाग कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केल्यास पर्यायी परीक्षा केंद्राची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती राज्याचे शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी दिली.

शिक्षणमंत्री मंगळवारी बेळगाव जिल्हय़ाच्या दौऱयावर होते. यावेळी त्यांनी बेळगाव व चिकोडी शैक्षणिक जिल्हय़ातील अधिकाऱयांशी संवाद साधून दहावी परीक्षे बाबत आढावा घेतला. राज्यातील 34 शैक्षणिक जिल्हय़ांपैकी 17 जिल्हय़ांना शिक्षणमंत्र्यांनी भेट दिल्याचे सांगितले. एका वर्गामध्ये 18 विद्यार्थी परीक्षेला बसणार असून, त्यांच्यामध्ये 3.5 फुटाचे अंतर ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शाळा सुरू करण्याबाबत मागविणार अभिप्राय

राज्यात 1 जुलै पासून शाळा सुरू करण्याचा विचार केला जात आहे. 1 जुलै पासून 4 थी ते 7 वी, 15 जुलै पासून 1 ली ते 3 री व 8 वी ते 10 वी व 20 जुलै पासून एल केजी, यू केजी सुरू करण्याचा विचार आहे. यासाठी पालकांमधून अभिप्राय मागविले जाणार आहेत. दहावीची परीक्षा 4 जुलै पर्यंत होणार असल्याने मुल्यमापन प्रक्रियेमुळे 8 वी ते 10 वी, 15 जुलै पासून सुरू करण्यात येणार आहे.

5 व 6 जून दरम्यान शाळा सुरू करण्याबाबत सर्व अनुदानीत, विना अनुदानीत व सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांचे पालक व एसडीएमसी कमीटीने बैठक घ्यावयाची आहे. 8 जून पासून दाखला नोंदणी प्रक्रियेला  सुरूवात होणार आहे. 10 ते 12 जून दरम्यान पुन्हा एसडीएमसी व पालकांची बैठक होऊन शाळा सुरू करण्याच्या तारखेबाबत चर्चा केली जाणार आहे. हा सर्व अभिप्रायाचा अहवाल 15 जून पूर्वी एसटीसी (स्टुडंट ट्रकिंग सीस्टीम) या सॉफ्टवेअरवर अपलोड करावयाचे आहे. 15 ते 30 जून दरम्यान शाळाबाहय़ा मुलांची नोंदणी करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत.

दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना हॉस्टेलची सोय करणार बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ामध्ये खानापूर तालुक्मयातील अनेक गावांमध्ये पावसाच्या दिवसात येणे जाणे शक्मय नसते अशा गावातील विद्यार्थ्यांसाठी परीक्षेबाबत कोणती व्यवस्था करणार असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला. यावेळी बोलताना शिक्षणमंत्री म्हणाले अशा दुर्गम भागांमधुन 10 वी परीक्षेसाठी येणाऱया विद्यार्थ्यांना हॉस्टेलची सोय केली जाईल, असे त्यांनी

Related Stories

काळय़ा दिनी आज लाक्षणिक उपोषण

Amit Kulkarni

कोरोनाग्रस्त आरोपीमुळे कॅम्प पोलीस स्थानकाला टाळे

Patil_p

शहरातील पाणीपुरवठय़ात दोन दिवस व्यत्यय

Amit Kulkarni

खानापूर तालुका श्रीराम सेना अध्यक्षपदी पुंडलिक मुतगेकर

Amit Kulkarni

केरळ ते जम्मू काश्मीर सायकल प्रवासाचा निर्धार

Omkar B

अलमट्टी धरणातून पाणी सोडण्याचा इशारा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!