तरुण भारत

रमेश जारकीहोळींना बेळगाव जिल्हा पालकमंत्रिपद

प्रतिनिधी/ बेंगळूर

पाटबंधारे मंत्री रमेश जारकीहोळी यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे बेळगाव जिल्हा पालकमंत्रिपद देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे हासन जिल्हा पालक मंत्रिपदी के. गोपालय्या यांची वर्णी लावण्यात आली आहे. मंगळवारी याबाबतचा अधिकृत आदेश जारी करण्यात आला आहे. आपल्याला पालकमंत्रिपद दिल्याबद्दल रमेश जारकीहोळी यांनी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांचे आभार मानले आहेत.

Advertisements

काँग्रेसला रामराम ठोकून भाजप प्रवेश करण्यापूर्वी रमेश जारकीहोळी यांनी आपल्याला पाटबंधारे खात्याबरोबरच बेळगाव जिल्हा पालकमंत्रिपद द्यावे, अशी अट घातली होती. ही अट भाजप वरिष्ठ नेत्यांनी मान्य केली होती. विधानसभा पोटनिवडणुकीनंतर त्यांना पाटबंधारे खात्याची जबाबदारी देण्यात आली. पण, पालकमंत्रिपद देण्यात आले नव्हते. त्यानंतर बेळगाव जिल्हय़ाच्या पालकमंत्रिपदासाठी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, मंत्री शशिकला जोल्ले यांनी देखील प्रयत्न केले होते. तसेच भविष्यात उमेश कत्ती देखील यासाठी दावेदार ठरतील, असा अंदाज होता. त्यामुळे जगदीश शेट्टर यांच्यावर बेळगाव जिल्हा पालकमंत्रिपदाचा अतिरिक्त भार सोपविण्यात आला होता.

जिल्हय़ातील नेत्यांच्या विरोधामुळे एप्रिल महिन्यात रमेश जारकीहोळी यांना कोणत्याही जिल्हय़ाची जबाबदारी देण्यात आली नव्हती. आता दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर त्यांना बेळगाव जिल्हा पालकमंत्रिपदी नेमण्यात आले आहे.

महेश कुमटहळ्ळींना झोपडपट्टी विकास निगमचे अध्यक्षपद

मंत्रिपदापासून वंचित राहिलेल्या अथणीचे आमदार महेश कुमठहळ्ळी यांना कर्नाटक झोपडपट्टी विकास मंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. गृहनिर्माण खात्याचे सचिव जी. लक्ष्मण यांनी मंगळवारी याबाबतचा अधिकृत आदेश दिला आहे. कर्नाटक झोपडपट्टी विकास आणि निर्मूलन अधिनियम 1973 च्या कलम 34 (2) (अ) नुसार विधानसभा सदस्य असणारे महेश इरणगौडा कुमठहळ्ळी यांना कर्नाटक झोपडपट्टी विकास मंडळाच्या अध्यक्षपदी नेमण्यात आले आहे. यापूर्वी मंत्रिपद दिलेच पाहिजे अशी भूमिका कुमठहळ्ळी यांनी घेतली होती. मात्र, त्यांना डावलण्यात आले होते. आता पक्षांतर्गत राजकीय हालचालींमुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांना योग्य पद दिले आहे.

Related Stories

बिम्सच्या डॉक्टरांना पुन्हा मारहाण

Patil_p

दिव्यांच्या प्रकाशाने शिवाजी उद्यान तेजोमय

Patil_p

चिकोडीतील सरकारी रुग्णालयच ‘क्वारंटाईन’

Patil_p

‘किंगपिन’ किरण विरनगौडरला अखेर अटक

Rohan_P

जिल्हय़ात साडे तीन लाख जनावरांना ‘लाळय़ा खुरकत’ प्रतिबंधक लस

Patil_p

बसवनकुडची येथे भरदिवसा 5 लाखांची घरफोडी

Patil_p
error: Content is protected !!