तरुण भारत

वास्कोत वादळी वाऱयात माड व झाड कोसळले, वीज पुरवठाही खंडित

प्रतिनिधी / वास्को

वास्कोत मंगळवारी पडलेल्या पावसात काही पडझडीच्या घटना घडल्या. मात्र, कुठेही विशेष नुकसानीच्या घटना घडल्या नाहीत. मात्र, पहिल्याच पावसात अग्नीशामक दलाला अनेक ठिकाणी धाव घ्यावी लागली.

Advertisements

वास्कोत गेले दोन दिवस पाऊस पडत आहे. सोमवारी तुरळक पाऊस पडला. मंगळवारी अधिक प्रमाणात पाऊस पडला. दुपारी व संध्याकाळी जोरदार वादळी वारेही  वाहू लागले. दोन दिवसांतील पावसात बऱयाच ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. मंगळवारी दुपारी वास्को शहरातील भाजी मार्केट समोरील झाड उन्मळून एफ.एल. गोम्स मार्गावर कोसळले. या घटनेत एका महिलेला किरकोळ मार लागला. तर एक दुचाकी चालकही थोडक्यात बचावला. संध्याकाळी उशिरा तारीवाडा बोगदा भागात एक माड वीज वाहिन्यांवर कोसळला. या घटनेमुळे देस्तेरो बोगदा तसेच बायणातील काही भागात बराच वेळ वीज खंडीत राहिली. अग्नीशामक दल व वीज खात्याच्या कर्मचाऱयांनी ही अडचण दूर करण्यासाठी धाव घेतली.

Related Stories

केंद्रीय पथकामार्फत वाघांच्या मृत्यूची चौकशी करणार : राणे

Patil_p

मोरजीत 90 वषीय वृद्धेने घेतली कोरोना लस

Amit Kulkarni

पेडणे सावळवाडा क्रीडा संकुलातील कोरोना निगा केंद्र रविवार 6 रोजी कार्यान्वित

Patil_p

सुदेश नागवेकर यांना पितृशोक

Amit Kulkarni

नोकर भरतीच्या अर्जांवरही सरकारकडून जनतेची लुट

Amit Kulkarni

‘लोकमान्य’मध्ये गुंतवणूकदारांना मोठी संधी

Patil_p
error: Content is protected !!