तरुण भारत

पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या शंभरीसमीप

जिल्हय़ात एकूण रुग्ण संख्या 93 : कुडाळ, कणकवली, वैभववाडी, सावंतवाडी तालुक्यात आढळले नवे रुग्ण

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

Advertisements

सिंधुदुर्ग जिल्हय़ात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आता शंभरीच्या उंबरठय़ावर येऊन ठेपली आहे. बुधवारी आणखी आठजण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने एकूण संख्या 93 वर पोहोचली आहे. नव्याने आढळलेल्या आठ रुग्णांमध्ये कुडाळ तालुक्यात तीन, कणकवली तालुक्यात दोन, वैभववाडी तालुक्यात दोन व सावंतवाडी तालुक्यात एक पॉझिटिव्ह रुग्ण सापडला आहे.

मंगळवारी कोरोना बाधित रुग्णांची संख्या 85 होती. त्यानंतर बुधवारी 93 नमुन्यांचे कोरोना तपासणी अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये आठ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. नव्याने आढळलेल्या आठ रुग्णांमध्ये कुडाळ तालुक्यातील डिगस, पणदूर व ओरोस या गावामध्ये प्रत्येकी एक, कणकवली तालुक्यातील हळवल व कलमठ गावामधील प्रत्येकी एक तसेच सावंतवाडी तालुक्यात निरवडे गावात एक आणि वैभववाडी तालुक्यात भुईबावडा व वेंगसर गावात प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे.

जिल्हय़ात आतापर्यंत आढळलेल्या एकूण 93 कोरोना बाधित रुग्णांपैकी आठजण कोरोनामुक्त झाले आहेत. एकाचा मृत्यू झाला आहे. तर एक रुग्ण उपचारासाठी मुंबईला गेला आहे. सद्यस्थितीत 83 रुग्ण पॉझिटिव्ह असून जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल आहेत.

असे आहेत कंटेनमेंट झोन

जिल्हय़ात सध्या कणकवली तालुक्मयातील पुढीलप्रमाणे कंटेनमेंट झोन आहेत : तळेरे, नाटळ, कुरंगवणे, नवीन कुर्ली वसाहत, जानवली गावातील घरटणवाडी येथील प्राथमिक शाळा, शेर्पे येथील बौद्धवाडी, शिवडाव, डामरे, वारगाव येथील धुमकवाडी, हरकुळ बुद्रुक येथील कांबळेवाडी, आईनतळवाडी, व्हावटवाडी, बीडवाडी येथील बीडवाडी हायस्कूल व आवार, मौजे कासार्डे येथील धुमाळवाडी, हरकुळ खुर्द येथील गावठण, तांबळवाडी, वरचीवाडी, गायकवाडवाडी, बावशी येथील शेळीचीवाडी, पियाळी येथील गावठण. वैभववाडी तालुक्मयात तिरवडे तर्फ सौंदळ गावातील घागरेवाडी, कोळपे व मेहबुबनगर, ब्राह्मणदेववाडी आणि उंबर्डे. सावंतवाडी तालुक्मयात कारिवडे गावठणवाडी, माडखोल येथील बामणादेवीवाडी, निरवडे माळकरवाडी, बांदा गाव गवळीटेंबवाडी, असनिये येथील भटवाडी, धनगरवाडी, वायंगणवाडी, चौकुळ अंतर्गत पाटीलवाडी, देऊळवाडी, जुवाटवाडी, खासकीलवाडी, तोरसवाडी, घोणसाटवाडी, मधलीवाडी, सातोसे-दुर्गवाडी. कुडाळ तालुक्मयात पणदूर मयेकरवाडी, आंब्रड गावची वरची परबवाडी, तांबेवाडी, टेंबवाडी, मौजे पडवे गावची पडवे पहिलीवाडी, गावराई गावची टेंबवाडी, रानबांबुळी गावची पालकरवाडी. मालवण तालुक्मयात हिवाळे, सुकळवाड येथील राऊळवाडी व ठाकरवाडी आणि वेंगुर्ले तालुक्मयातील मातोंड.

24 हजार 921 जण संस्थात्मक विलगीकरणात

जिल्हय़ात एकूण 24 हजार 921 व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात असून त्या पैकी 579 व्यक्ती या शासकीय संस्थात्मक अलगीकरण कक्षात आहेत. तर 23 हजार 17 व्यक्तींना गावपातळीवरील संस्थात्मक अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. नागरी क्षेत्रात 1 हजार 325 व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत. तर जिल्हय़ात प्रवेश केलेल्या इतर सर्व नागरिकांना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

108 नमुन्यांच्या अहवालांची प्रतीक्षा

जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 2 हजार 138 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी 2 हजार 30 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 89 अहवाल पॉझिटिव्ह आले असून उर्वरित 1 हजार 938 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अजून 108 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात सध्या 120 रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी 67 रुग्ण डेडिकेटेड कोवीड हॉस्पीटलमध्ये, 45 रुग्ण डेडिकेटेड कोवीड हेल्थ केअर सेंटरमध्ये, आठ रुग्ण कोविड केअर सेंटरमध्ये दाखल आहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत बुधवारी 7 हजार 351 व्यक्तींची तपासणी करण्यात आली.

अन्य जिल्हय़ातून येणाऱयांची संख्या 70 हजारावर

मुंबई-पुणे शहरासह जिल्हय़ाबाहेरुन येणाऱया लोकांचा ओघ अजूनही थांबलेला नसून जिल्हय़ात येण्याचे प्रमाण वाढतच आहे. परराज्यातून व महाराष्ट्र राज्याच्या अन्य जिल्हय़ातून सिंधुदुर्ग जिल्हय़ात 2 मेपासून बुधवार अखेरपर्यंत एकूण 70 हजार 77 व्यक्ती दाखल झाल्या आहेत.

महात्मा फुले आरोग्य योजना 12 रुग्णालयांना लागू

कोवीड-19 आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सर्व जनतेसाठी लागू केली आहे. जिल्हय़ातील जिल्हा रुग्णालय-ओरोस, उपजिल्हा रुग्णालय – सावंतवाडी, कणकवली व शिरोडा. संजीवनी हॉस्पिटल – सावंतवाडी, सुयश हॉस्पिटल – कुडाळ, लाईफ टाईम हॉस्पिटल – पडवे, नागवेकर हॉस्पिटल – कणकवली, गुरुकृपा हॉस्पिटल – कणकवली, संजींवनी हॉस्पीटल – कणकवली, साईलीला हॉस्पीटल – नाटळ, गोवा मेडिकल कॉलेज हॉस्पीटल – बांबोळी-गोवा अशा 12 रुग्णालयांत ही योजना लागू आहे.

कोरोना बाधित रुग्णांची तालुकानिहाय स्थिती

कणकवली                    33

मालवण                                  15

कुडाळ                         14

सावंतवाडी                  11

देवगड                         09

वैभववाडी                   08

वेंगुर्ले                          03

एकूण                          93

संस्थात्मक अलगीकरण               24921

पाठविण्यात आलेले एकूण नमुने               02138

अहवाल प्राप्त झालेले नमुने                      02030

आतापर्यंत पॉझिटिव्ह नमुने                    00093

निगेटिव्ह आलेले नमुने               01938

अहवाल प्राप्त न झालेले नमुने                   00108

विलगीकरण कक्षात दाखल                      00120

सद्यस्थितीत पॉझिटिव्ह रुग्ण                   00083

बुधवारी तपासणी झालेल्या व्यक्ती           07351

Related Stories

जिह्यात 846 ग्रामपंचायत आरक्षणाची लॉटरी आज फुटणार!

Patil_p

‘तेजस’च्या कंत्राटी कामगारांना कोकण रेल्वेकडून मदत!

Patil_p

वेरलीत बिबटय़ाकडून तीन बकऱयांचा फडशा

NIKHIL_N

अनधिकृत वाळू उत्खननाची यादीच सादर!

NIKHIL_N

खेडमधील २३ जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह

Abhijeet Shinde

गुहागरातील 1196 लोकांचे स्थलांतर

Patil_p
error: Content is protected !!