तरुण भारत

लडाख म्हणजे ‘डोकलाम’ नव्हे : चीन

पर्वतीय भागात युद्ध लढण्याची पूर्ण तयारी केल्याचा दावा : ग्लोबल टाईम्सच्या माध्यमातून धमकाविले

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisements

लडाखचे गलवान खोरे आणि पॅगोंग त्सो सरोवराच्या परिसरात कारगिलप्रमाणेच अत्यंत धूर्तपणे हजारोंच्या संख्येत सैनिक तैनात करणाऱया चिनी ड्रगनने आता भारताला थेट धमकाविले आहे. लडाख म्हणजे डोकलाम नव्हे आणि आमच्या सैन्याने भारताशी पर्वतीय क्षेत्रांमध्ये युद्ध लढण्याची पूर्ण तयारी केल्याचे चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे. डोकलामच्या घटनेनंतर स्वतःच्या ताफ्यात रणगाडय़ांपासून अत्याधुनिक ड्रोन सामील केल्याचे चीनने सांगितले आहे.

चीनने स्वतःच्या ताफ्यात टाइप 15 रणगाडे, झेड-20 हेलिकॉप्टर आणि जीजे-2 ड्रोन सामील केले असून पर्वतीय आणि उंचीवरील भागांमध्ये युद्धात बळ पुरवतील असे ग्लोबल टाईम्सने चिनी विश्लेषकाचा दाखला देत म्हटले आहे. टाइप 15 रणगाडा मागील वर्षीच सैन्यात सामील करण्यात आला होता. तिबेटच्या पर्वतीय क्षेत्रांमध्ये हा कमी वजनाचा रणगाडा अत्यंत सहजपणे काम करणार असल्याचे सांगण्यात आले. चीनने याचबरोबर अत्याधुनिक तोफ स्वतःच्या ताफ्यात केल्याचा दाखला देत सैन्यबळाचे प्रदर्शन चालविले आहे.

काही सैनिक कोरोनाबाधित आढळल्याने भारताने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक मार्चमध्ये प्रस्तावित स्वतःचा सैन्यसराव काही कालावधीसाठी टाळला होता. याचाच लाभ उचलून चिनी सैन्याने सामरिकदृष्टय़ा महत्त्वपूर्ण भारतीय सैन्याच्या गस्तक्षेत्रात पुढे सरकत स्वतःचे स्थान मजबूत केले आहे. चीनच्या या घुसखोरीमुळे सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. चीनच्या या घुसखोरीला भारतानेही चोख प्रत्युत्तर देत स्वतःचे सैनिक तैनात केले आहेत. भारतीय सैन्य चिनी सैन्याच्या घुसखोरीचा प्रकार हाणून पाडण्यासाठी सज्ज आहे. भौगोलिक स्थिती पाहता सीमेवर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून दोन्ही देशांदरम्यान वाद आहे. भारताने लडाखच्या सीमेपर्यंत पायाभूत सुविधा वाढविल्याने तसेच रस्त्यांचे जाळे विणल्याने चीनचा जळफळाट होत असल्याचे मानले जात आहे.

भारत-चीनदरम्यान 6 रोजी चर्चा

सीमा वादादरम्यान भारत-चीन यांच्यात 6 जून रोजी लेफ्टनंट जनरल स्तरीय चर्चा होणार आहे. भारताच्या वतीने 14 व्या बटालियनचे कमांडर लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग चर्चेत सामील होतील. वाद संपुष्टात आणण्यासाठी दोन्ही देशांच्या सैन्यादरम्यान मंगळवारी देखील चर्चा झाली होती. लडाखमध्ये सीमा वादासंदर्भात आतापर्यंत 10 वेळा चर्चा झाली आहे. दोन्ही देशांनी शांततेत वाद सोडविण्याची तयारी दर्शविली आहे.

युद्धासाठी 20 टक्के चिनी सैनिक अयोग्य

चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने स्वतःचे 20 टक्के सैनिक युद्धासाठी अयोग्य असल्याचे मान्य करत ते अत्याधिक प्रमाणात हस्तमैथून करत असल्याचे म्हटले आहे. 20 टक्के चिनी सैनिकांचे वजन गरजेपेक्षा अधिक असून ते युद्धासाठी अयोग्य आहेत. पीएलएने स्वतःच्या सैनिकांना अधिक प्रमाणात व्हिडिओ गेम न खेळण्याचा, स्मार्टफोनचा वापर आणि हस्तमैथूनाचे प्रमाण कमी करण्याचा निर्देश दिला होता. चिनी सैन्याच्या चाचणीत 25 टक्के सैनिक अयोग्य आढळण्यामागे मद्याचे प्रचंड सेवनही कारणीभूत आहे. याचबरोबर अनेक सैनिक खराब आहारामुळे अयोग्य ठरले आहेत. स्मार्टफोनचा प्रचंड वापर केल्याने सैनिकांची नजर कमकुवत झाली आहे.

Related Stories

विवाह समारंभांमधील उपस्थितीत आणखी कपात

Patil_p

देशात नव्या बाधितांपैकी 70 टक्के रुग्ण केरळात

Amit Kulkarni

जीवनावश्यक वस्तू कायदा बदलणार

Patil_p

महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार

Abhijeet Shinde

26 वर्षांनी इतिहासाची पुनरावृत्ती

Patil_p

व्हिलचेअरवर फिरणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

Abhijeet Shinde
error: Content is protected !!