तरुण भारत

हिंडाल्को येथील भाजीमार्केटमध्ये चिखलाचे साम्राज्य

एपीएमसी येथे भाजीमार्केट सुरु करण्याची परवानगी द्यावी

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

कोरोनामुळे एपीएमसीमधील गर्दी टाळण्यासाठी शहराच्या बाहेर तीन ठिकाणी तात्पुरते भाजीमार्केट सुरु करण्यात आले. मात्र या भाजीमार्केटांची अवस्था दयनीय झाली आहे. पहिल्याच पावसात बी. एस. येडियुराप्पा रोडवरील भाजीमार्केटच्या गाळय़ावरील पत्रे उडून गेले तर गेल्या तीन दिवसांपासून सुरु झालेल्या दमदार पावसामुळे हिंडाल्को येथील भाजीमार्केटमध्ये गुडघाभर चिखल झाला आहे. यामुळे त्यामधून पायी चालणे अवघड बनले आहे. भाजी नको म्हणण्याची वेळच साऱयांवर आली आहे.

सोमवारपासून एपीएमसीमध्ये पुन्हा भाजी खरेदी करण्यास मुभा द्यावी, अशी मागणी एपीएमसी सदस्यांकडून जिल्हाधिकाऱयांकडे करण्यात आली होती. मात्र त्यांनी त्याला नकार दिला. मात्र आज अवस्था बिकट झाली आहे. हिंडाल्को जवळील भाजीमार्केटमध्ये लाल माती टाकण्यात आली होती. त्यामध्ये ट्रक व इतर वाहने जाऊन गुडघाभर चिखल झाला आहे. यामधून खरेदीदारांना आणि शेतकऱयांना चालणे अवघड झाले आहे. हातामध्ये चपल किंवा बुट घेवून चालताना कसरत करावी लागत आहे.

Related Stories

‘त्या’ रुग्णवाहिकेतील 27 जणांविरुद्ध एफआयआर

Patil_p

आनंद चॅलेंजर्स, साईराज वॉरियर्स संघांचे विजय

Patil_p

समतेसाठी गांधी-आंबेडकरी विचारांचा संगम व्हावा

Patil_p

मनपा कर्मचाऱयांना पोलिसांच्या लाठीचा प्रसाद

Patil_p

मॉर्निंग वॉक जीवावर बेतले असते

Patil_p

गोवा बनावटीच्या दारूसह किमती कार जप्त

Amit Kulkarni
error: Content is protected !!