तरुण भारत

हेदोडे येथील नदीत बुडून दीपक खरवत यांचे दुर्दैवी निधन

वाळपई / प्रतिनिधी

 सत्तरी तालुक्मयातील हेदोडे याठिकाणी वेळूस नदीच्या पात्रात बुडून कोपार्डे धनगरवाडा येथील दीपक विठू खरवत या 22 वषीय तरुणाचे दुर्दैवी निधन झाले. सदर घटना आज संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली.

 याबाबतची माहिती अशी की सत्तरी तालुक्मयातील हेदोडे पुलाखाली असलेल्या नदीच्या पात्रात दीपक व त्याचे अन्य चार मित्र आंघोळीसाठी गेले होते.

सदा नदीच्या पात्रात आंघोळ करीत असतानाच अचानक दीपक पाण्यात बुडाला .

याबाबतची माहिती मिळताच त्यांच्या मित्रांनी वाळपईच्या अग्निशमन दलाच्या यंत्रणेशी संपर्क साधून त्यांना पाचारण केले.  त्यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन दीपक यांचा मृतदेह शोधून काढण्यात यश मिळविले.

 दीपक खरवत हा 22 वर्षिय तरुण असून तो कोपर्डे धनगरवाडा येथील राहणारा आहे. दीपक यांचे निधन अचानक पाण्यात बुडून झाल्यामुळे  सभोवताली भागांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

 वाळपई पोलिस स्थानकाने सदर घटनेचा पंचनामा करून सध्या मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये पाठविण्यात आला आहे. यासंदर्भात मिळालेल्या अधिक माहितीनुसार दीपक व अन्य चार मित्र सकाळपासूनच नदीच्या पात्रात रेती काढत होते. ते काम संपल्यानंतर ते अंघोळीसाठी गेले होते. आंघोळ करताना दीपक हा सदर ठिकाणी बुडाला.

दीपक यांच्या निधनामुळे कोपार्डे गावावर पूर्णपणे शोककळा पसरली आहे. dयंत चांगल्या स्वभावाचा व सतत हसऱया चेहऱयाचा दीपक यांचा मृत्यू झाल्यामुळे भागांमध्ये शोक व्यक्त करण्यात येत आहे.

त्यांच्या पश्चात आई भाऊ असा परिवार आहे.

Related Stories

गोवा आरोग्य सेवेचे सशस्त्रदलाकडून अभिनंदन

Omkar B

राज्यात जमीन रुपांतरणाचा सपाटा

Patil_p

नव्वदीतील रामराय गावकराची चित्रशाळेच्या माध्य़मातून अखंडीतपणे ‘गणेश सेवा’

Patil_p

पणजी मनपा प्रभाग 21 मध्ये वैष्णवी उगाडेकरचा घरोघरी प्रचार

Amit Kulkarni

स्वामी स्वरुपानंदजी यांची 7 पासून फोंडय़ात प्रवचने

Patil_p

लंडनस्थित डिचोलीतील इसमाचा कोरोनामुळे मृत्यू

Omkar B
error: Content is protected !!