तरुण भारत

माजी मंत्री मिकी पाशेकोविरुद्धची सुनावणी तहकूब

प्रतिनिधी / मडगाव

गोव्याचे माजी मंत्री मिकी पाशेको यांच्याविरुद्धच्या खटल्याची सुनावणी आता या महिन्याच्या अखेरीस होणार आहे.

Advertisements

उतोर्डा येथील समुद्रकिनाऱयावर या प्रकरणातील तक्रारदाराला शिव्या देणे, जीवे मारण्याची धमकी दिल्याचा फ्रान्सिस्क झेव्हीयर पाशेको उर्फ मिकी पाशेको तसेच रोबीनो फर्नाडिस आणि सेबास्तियान वाझ यांच्यावर आरोप आहे. या सर्व संशयित आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या 336, 504 आणि 506 (2) कलमाखाली वेर्णा पोलिसांनी गुन्हा नोंद केलेला आहे.

या खटल्याची सुनावणी मडगावच्या कनिष्ठ न्यायालयात चालू आहे. काल बुधवारी या खटल्याची सुनावणी होती. मात्र कोव्हीड-19 संबंधीत न्यायसंस्थेने जारी केलेल्या एका आदेशामुळे ही सुनावणी आता या महिन्याच्या अखेरीला होणार आहे.

Related Stories

पिसुर्ले इतिहासकालीन महादेव मंदीराचा रस्ता खाणमालकाने अडविला

Omkar B

किरण ठाकुर यांच्याकडून निर्णयाचे जोरदार स्वागत

Omkar B

नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ फोंडय़ात 5 रोजी भव्य रॅली

Patil_p

आमदार अपात्रता याचिका सुनावणीस मुहूर्त सापडेना

Patil_p

‘लॉकडाऊन’मुळे शेजारील राज्यात गोवेकर अडकलेत

Omkar B

कोरोनावर आता लॉकडाऊन हाच उपाय

Omkar B
error: Content is protected !!