तरुण भारत

अमेरिकेत 7 जूनपर्यंत संचारबंदी

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

आफ्रिकन वंशाच्या कृष्णवर्णीय नागरिकाची पोलिसांकडून हत्या झाल्यानंतर अमेरिकेच्या 24 राज्यात हिंसक आंदोलने सुरू आहेत. हे आंदोलन रोखण्यासाठी अमेरिकेत 7 जूनपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 

Advertisements

मिनियापोलीस येथे मागील सोमवारी जॉर्ज फ्लॉईड या आफ्रिकन अमेरिकी व्यक्तीचा श्वेतवर्णीय पोलीस अधिकाऱ्याने गुडघा मानेवर दाबून घुसमटवल्याने मृत्यू झाला होता. त्यानंतर शुक्रवारपासून अमेरिकेत हिंसाचार उफाळला आहे. 

फ्लॉईड यांच्या हत्येच्या निषेधार्थ अमेरिकेतील 24 राज्यात हिंसाचाराचा आगडोंब उसळला असून, जाळपोळ, लूटमार, सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड असे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. त्यासाठी 17 हजार सुरक्षा रक्षकही तैनात करण्यात आले आहेत. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलीस अश्रूधूर रसायने, रबरी गोळ्यांचा वापर करीत आहेत. आंदोलकांच्या गाड्यांच्या काचाही फोडण्यात आल्या.

Related Stories

देशात ३१ जुलैपर्यंत ‘वन नेशन, वन राशन’ योजना लागू करावी; , सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

Abhijeet Shinde

महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाकडून नवरात्रौत्सवासाठी नियमावली जाहीर

Rohan_P

उत्तर प्रदेशातील प्रत्येक जिल्ह्यात बनवले जाणार तात्पुरते जेल; नव्या कैद्यांची होणार कोरोना टेस्ट

Rohan_P

राज्यात पुढच्या तीन तासांत विजेच्या कडकडाटसह पावसाची शक्यता

Abhijeet Shinde

सांगली : दुधोंडी येथे तिहेरी खून ; मोहिते- साठे गटात धुमश्चक्री

Abhijeet Shinde

टोंगाला भूकंपानंतर त्सुनामीचा तडाखा

Patil_p
error: Content is protected !!