तरुण भारत

अडीच महिन्यानंतर बार्शी शहरात कोरोनाचा शिरकाव

शहरात १ तर ग्रामीण भागात ४, एकूण १७ पॉझिटिव्ह

बार्शी/प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आता बार्शी तालुक्याला ही कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत आहे. स्थलांतरित लोकांपासून हा विषाणू बार्शीत पोहोचला असून जामगाव या गावापासून रुग्ण सापडण्याची सुरुवात झाली होती त्यात आता जामगाव याच गावातील संपर्कात आलेला बार्शी शहरातील वाणी प्लॉट येथील रहिवासी आज पॉझिटिव्ह निघाला असून आज बार्शी तालुक्यात ग्रामीण भागात जामगाव येथील तीन जण आणि उक्कडगाव येथील एक रुग्ण पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी संतोष जोगदंड यांनी दिली. आता बार्शी तालुक्यात सतरा पॉझिटिव्ह रुग्ण झाले असून नागरिकांनी घाबरून न जाता आपली काळजी घ्यावी आणि घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन आरोग्य अधिकारी संतोष जोगदंड यांनी केले.

Advertisements

दरम्यान, बार्शी शहर व तालुक्‍यातील कोरोना विषाणू संदर्भात जिल्हा प्रशासनाकडून गुरुवारी सकाळी दहा जणांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यात बार्शी शहरात एक, जामगाव येथील तीन रुग्ण, उक्कडगाव येथील १ असे पाच नवे रुग्ण आढळले आहेत तर ४ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. कोरोना बाधितांची एकूण संख्या १७ झाली आहे. १५०

कोरोना विषाणू रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने २२ मार्चपासून लॉकडाउन सुरु केल्यानंतर तब्बल अडीच महिन्यांनी बार्शी शहरात कोरोना बाधित रुग्ण आढळला असून शहरात एकच खळबळ उडाली आहे. गुरुवारी सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात पाच जण पॉझिटिव्ह आढळले. तर बार्शी एक, जामगाव एक, तावरवाडी एक, वैराग एक, शेंद्री एक असे पाच जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. अद्याप ९ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत, असे डॉ. जोगदंड यांनी स्पष्ट केले.

बार्शी शहरात कोरोना संसर्गाची बाधा होऊ नये यासाठी बार्शी नगरपरिषद, ग्रामीण रुग्णालय, खासगी रुग्णालय यांनी फवारणी करुन, स्वच्छता ठेवून मोठी दक्षता घेतली होती. पण अखेर शहरात कोरोना बाधित रुग्ण आढळला आहे. दरम्यान, पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी पथकांमार्फत नाकेबंदी करुन सुमारे १५० पेक्षा अधिक गुन्हे शहर पोलिस ठाण्यात दाखल केले असून मे अखेर पर्यंत बार्शीत रेड झोन मधून येणाऱ्या नागरिकांचा ओघ सुरू होता. आता स्थलांतरित नागरिकांकडून बार्शीत कोरोना विषाणू आल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली असून प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे

Related Stories

जिल्हय़ात 75 कोरोनामुक्त, 00 बाधित

Patil_p

आता नवा वसूली मंत्री कोण?, चित्रा वाघ यांचा सवाल

Rohan_P

लसीकरणाची गती मंदावल्यास महाराष्ट्रात करोनाची तिसरी लाट ; तज्ज्ञांचा इशारा

Abhijeet Shinde

दिलासादायक : महाराष्ट्रात मागील 24 तासात 11,077 रुग्ण कोरोनामुक्त!

Rohan_P

वनमंत्री संजय राठोड हाय हाय..!

Abhijeet Shinde

ज्याची बायको पळून जाते, त्याचे नाव मोदी ठरतं

datta jadhav
error: Content is protected !!