तरुण भारत

लडाख : चिनी सैनिक 2 किमी मागे हटले

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

मागील दोन आठवड्यांपासून लडाखच्या गलवान खोऱ्यात एकमेकांसमोर उभे ठाकलेले भारत आणि चीनचे सैन्य मागे हटले आहे. सीमारेषेपासून चिनी सैनिक 2 तर भारतीय सैनिक 1 किमी मागे गेले आहेत. 

भारताच्या नियंत्रणात असलेल्या लडाखमधील फिंगर फोर भागात चिनी सैन्य मागील काही दिवसांपासून उभे ठाकले होते. त्यामुळे भारत आणि चिनी सैन्यात तणावाचे वातावरण होते. चिनी सैन्य आपल्या सीमावर्ती भागात सामर्थ्य दाखविण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, चीनची मंदावलेली अर्थव्यवस्था, 5 मे रोजी चिनी PLA च्या आक्रमक भूमिकेला भारतीय लष्कराने दिलेले प्रत्युत्तर, चिनी नागरिकांमध्ये वाढलेली बेरोजगारी आणि वाढता असंतोष यामुळे चीनचे सैन्य मागे हटल्याचे आंतरराष्ट्रीय प्रकरणातील तज्ञ कमर आगा यांनी सांगितले.

दोन्ही देशातील तणावावर चर्चा करण्यासाठी 6 जून रोजी दोन्ही लष्कराची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीचे नेतृत्व भारतातील लेह येथील 14 कोर्सेस कमांडरचे प्रतिनिधीमंडळ करणार आहे.

Related Stories

कोणतेही सण सार्वजनिकरित्या साजरे करू नका : गृहमंत्री

prashant_c

अर्थमंत्री अजित पवार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र

prashant_c

अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन

Rohan_P

अभिषेक बच्चन याची कोरोनावर मात!

pradnya p

अमानुतल्ला खान विरोधात एफआयआर

Patil_p

चिंताजनक! 24 तासात 1.31 लाख बाधितांची नोंद

datta jadhav
error: Content is protected !!