तरुण भारत

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अकुशल दिव्यांगांना रोजगार हमीचा लाभ

प्रतिनिधी / कोल्हापूर

ग्रामीण भागातील अकुशल दिव्यांगांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात आलेल्या आर्थिक अडचणी कमी करण्यासाठी त्यांना रोजगार हमी योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी दिली.

Advertisements


ग्रामीण भागातील अकुशल दिव्यांगांना कोव्हिड-19 च्या संचार बंदी काळात आलेल्या आर्थिक अडचणी कमी करण्याच्या उद्देशाने शासनाने हा उपक्रम चालविला असून कोल्हापूर जिल्हयातील अकुशल दिव्यांगांना रोजगार हमी योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे. अशा अकुशल दिव्यागांनी त्यांच्या शारिरीक क्षमतेनुसार व कुशलतेप्रमाणे रोजगार हमी योजनेबाबत जॉब कार्ड तयार करून घेण्यासाठी आपल्या गावातील ग्रामसेवकांशी संपर्क साधावा. याबाबत कोणतीही अडचण आल्यास संबंधित तालुक्याच्या गट विकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. मित्तल यांनी केले आहे.

Related Stories

पात्र शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीचा लाभ घ्यावा – सहकारमंत्री

Sumit Tambekar

उदयनराजेंचा निर्णय पुन्हा शिवेंद्रराजेंवर

Patil_p

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

बारा बलुतेदारांचे मराठा आरक्षणाला बळ

Abhijeet Shinde

कोविड योद्धय़ांसाठी राखीव बेड ठेवा

Patil_p

कोल्हापूर जिल्ह्यात 5 जणांचा मृत्यू, नव्या रूग्णांत वाढ

Abhijeet Shinde
error: Content is protected !!