तरुण भारत

भारती एअरटेलमध्ये गुंतवणुकीस ऍमेझॉन उत्सुक

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली :

सध्याला रिलायन्स जिओमध्ये गुंतवणुकीचा सपाटा सुरू असतानाच आता टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलमध्ये ऍमेझॉन गुंतवणूकीस उत्सुक असल्याची बातमी समोर आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही गुंतवणूक 2 अब्ज डॉलरपर्यंत होऊ शकते. यासंदर्भात दोन्ही कंपन्यांमध्ये प्राथमिक स्वरूपाची बोलणी सुरू आहे. गुंतवणूकीच्या माध्यमातून ऍमेझॉन भारती एअरटेलमध्ये 5 टक्के हिस्सा आपल्याकडे ठेऊ शकते. भारती एअरटेल ही भारतातील तिसऱया क्रमांकाची मोठी टेलिकॉम कंपनी असून तिचे 30 कोटी इतके ग्राहक आहेत. ऍमेझॉन ही इ कॉमर्स क्षेत्रात आपला व्यवसाय विस्तार करण्याचा विचार करत असून कदाचित त्याकरीता भविष्यातील संधी म्हणून भारती एअरटेलमध्ये गुंतवणूक करण्याचे संकेत व्यक्त केले जात आहेत. भारतात इंटरनेट वापरकर्ते आणि स्मार्टफोनधारकांची संख्या मोठी असून हे पाहता ऍमेझॉनने भारती एअरटेलमध्ये रस घेतला असावा असाही कयास व्यक्त केला जातोय.

Advertisements

Related Stories

विप्रो सर्वात मोठा व्यवहार करण्याच्या तयारीत

Patil_p

सोने आठ महिन्यांतील निच्चांकी पातळीवर

datta jadhav

मारुती सुझुकीच्या नफ्यात वाढ

Patil_p

अनाथांची पेन्शन!

Patil_p

सेन्सेक्स घसरणीत; निफ्टी तेजीत

Patil_p

कोविडचे 15 लाख विमा दावे निकालात

Amit Kulkarni
error: Content is protected !!