तरुण भारत

अखेर सहा दिवसांचा तेजीचा प्रवास थांबला

वृत्तसंस्था/ मुंबई :

शेअर बाजारातील मागील सहा सत्रांची तेजी कायम राहिली होते. परंतु अखेर चालू आठवडय़ातील चौथ्या सत्रात गुरुवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स जागतिक बाजारातील कमजोर वातावरणामुळे तेजीचा प्रवास खंडीत झाल्याचे पहावयास मिळाले आहे. गुरुवारी बँकिंग समभागांची मोठय़ा प्रमाणात विक्री झाल्यामुळे घसरणीचे सत्र राहिले होते.

Advertisements

दिवसभरातील व्यवहारात सेन्सेक्सचा निर्देशांक 599 अंकांनी चढउतारात राहिला होता. परंतु दिवसअखेर सेन्सेक्स 128.84 अंकांनी घसरुन निर्देशांक 33,980.70 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 32.45 अंकांनी घसरुन निर्देशांक 10,029 वर बंद झाला. दिवसभरातील कामगिरी दरम्यान सेन्सेक्सने 34,310.14 चा उच्चांक आणि 33,711.24 अंकांनी निच्चांकी पातळी गाठली होती.

प्रमुख कंपन्यांमध्ये एशियन पेन्ट्सचे समभाग सर्वाधिक पाच टक्क्मयांनी घसरले आहेत तर सोबत बजाज फायनान्स, एचडीएफसी, इंडसइंड बँक, ऍक्सिस बँक आणि कोटक बँक यांचे समभाग घसरले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये टेक महिंद्रा, सन फार्मा, भारती एअरटेल आणि एचसीएल टेक यांचे समभाग मात्र फायद्यात राहिले आहेत. निफ्टीतील ऑटो कंपन्या, फार्मा, आयटी आणि मेटल उद्योग कंपन्यांचे समभाग फायद्यात होते. 

जागतिक बाजारातील चढउताराच्या कामगिरीनंतर देशातील शेअर बाजाराची स्थिती स्थिर राहिली होती. परंतु दिवसागणिक देशातील कोविड19 चे रुग्ण वाढत असल्यामुळे बाजारावरील गुंतवणूकदारांची पकड कमी होत असल्याचे संकेत तज्ञांकडून व्यक्त केले जात आहेत. व्याजदरात सवलत न देणे नुकसानकारक ठरणार असल्याच्या न्यायालयाच्या टिप्पणीमुळे वित्तीय कंपन्यांच्या समभागांमध्ये गुरुवारी विक्री झाल्याचे दिसून आले आहे. यामुळे आगामी काळात या निर्णयाचे पडसाद कोणता परिणाम करणार आहेत, ते पहावे लागणार असल्याचे यावेळी विविध विश्लेषकांनी स्पष्ट केले आहे. सकाळी शेअर बाजार घसरणीनेच सुरू झाला. सेन्सेक्स सुरूवातीला 37 अंकांनी घसरलेला दिसला. निफ्टीनेही हा सूर धरला होता. पण नंतर मात्र सेन्सेक्स, निफ्टीने प्रगती साधण्यास सुरूवात केली.

Related Stories

असंघटित कामगारांसाठी धोरण हवे

Omkar B

रेल्वेचे 2030 पर्यंत कार्बन उत्सर्जन शुन्यचे ध्येय

Patil_p

आता रिलायन्समधील अंबानी कुटुंबाची हिस्सेदारी वाढली

tarunbharat

झी एन्टरटेनमेन्टचे बाजारमूल्य 70 हजार कोटीवर पोहचणार ?

Amit Kulkarni

‘टीपीजी’ टाटा मोर्ट्समध्ये 7,500 कोटींची गुंतवणूक करणार

Patil_p

शेअर बाजारात घसरण कायम

Patil_p
error: Content is protected !!