तरुण भारत

कारहुणवी साध्या पध्दतीने साजरा करण्याचे आवाहन

प्रतिनिधी / अक्कलकोट

शुक्रवारी ग्रामीण भागात कारहुणवी सण होणार आहे. मात्र कोरोनोच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा न करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. बैलजोड्यांची मिरवणूक,वाजंत्री वगैरे बाबी वगळता सण साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात कारहुणवी सणावर कोरोनाचे संकट ओढावले आहे. महाराष्ट्र – कर्नाटकाच्या सिमावर्ती भागात कारहुणवी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

Advertisements

कारहुणवीच्या निमीत्ताने बैलजोड्यांना सजवून मिरवणुका काढल्या जातात. कृषी संस्कृतीमध्ये कारहुणवी सणाला अनन्यसाधारण महत्व आहे. पण या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे या सणाला फटका बसला आहे. ग्रामीण भागात कारहुणवी सण घरगुती पध्दतीने विधीवत पूजा करून सण साजरा करावे असे कळविण्यात आले आहे. प्रशासनाकडून बळीराजांने सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

अमित ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल

Rohan_P

सातारा : त्रिपुटीच्या रुग्णाच्या संपर्कातील २३ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

Abhijeet Shinde

धामणी खोऱ्यातील वेतवडे पैकी भेंडाई धनगरवाडा गेली २१ दिवस अंधारात

Abhijeet Shinde

पुणे : खडकवासला धरणातून 2500 क्युसेस पाण्याचा विसर्ग; भिडे पूल पाण्याखाली

Rohan_P

सोलापूर : कुर्डुवाडी शहरात रासायनिक खते, औषधांचा तुटवडा

Abhijeet Shinde

कोल्हापूर : राजू शेट्टींनी आमदारकीसाठी ताळतंत्र सोडले

Abhijeet Shinde
error: Content is protected !!