तरुण भारत

कोडोलीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला; सर्वत्र खळबळ

वारणानगर / प्रतिनिधी

कोडोली येथे मुंबईवरून आलेल्या एकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे तालुक्यात पन्नास हजारावर लोकसंख्या असलेल्या कोडोलीत सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. पन्हाळा येथील एकलव्य कोरोना सेंटरमध्ये पोहचण्यास उशीर झाल्याने एका दिवसासाठी त्यास कोडोली येथे प्राथमिक स्तरावर संस्थात्मक क्वारंटाईन केले होते.

Advertisements

याबाबतची माहिती अशी, कोडोली येथील मुंबईत रहाणारी एक व्यक्ती कोल्हापूर येथील हॉस्पिटल मध्ये नियमीत वैद्यकिय तपासणी कामी येते यावेळीही सदर व्यक्ती मुंबई येथून पत्नी व मुलासह आले होते. पोलिसांनी त्याला कोरोनाविषाणूच्या तपासणी कामी पन्हाळा येथील एकलव्य कोरोनाकेअर सेंटर येथे पाठविले होते. लॅब मध्ये स्वॅप घेणेची वेळ संपल्यानंतर सदर व्यक्ती केअर सेंटर मध्ये आल्याने त्यास कोडोली येथे संस्थात्मक क्वारंटाईन साठी मंगळवारी पाठविले होते . बुधवारी सकाळी त्याला एकलव्य केअर सेंटर येथे स्वॅप देणेसाठी पाठविले होते. गुरुवारी रात्री त्याचा कोरोणा अहवाल पॉझीटीव्ह आल्याचे माहिती समजताच सर्वत्र खळबळ उडाली आहे .

येथील ग्रामस्तर समितीच्या सदस्यांनी कोरोनाविषाणूचा प्रादुर्भाव रोखणेसाठी दक्षपणे काम केले होते. परंतु या एका घटनेमुळे गाळ्बोट लागल्याची चर्चा कोडोलीत होऊ लागली आहे. संस्थात्मक क्वॉरंटाईन असल्याने या तरुणाचा अन्य नागरीकांशी सपंर्क आलेला नाही तरी नागरिकांनी घाबरणेचे आवश्यकता नसल्याचे सरपंच व ग्रामस्तर समितीचे अध्यक्ष शंकर पाटील यांनी सांगितले. त्यामुळे परंत क्वारंटाईन सेंटरवर प्रशासनामार्फत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करणेचा निर्णय घेणेत आला आहे.

Related Stories

थिएटर्स उघडणार; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

datta jadhav

महाराष्ट्राला औषधांचा पुरवठा केल्यास तात्काळ कारवाई करु; मंत्री नवाब मलिक यांचा दावा

Rohan_P

विना परवाना फ्लेक्सप्रकरणी संतोषभाऊ जाधवांवर गुन्हा

Patil_p

“कंगनाच्या गालापेक्षाही जास्त सुंदर रस्ते बनवू”

Sumit Tambekar

आम्ही जनतेचे सेवकरी, ‘अदानी-अंबानी’ नव्हे : ना. हसन मुश्रीफ यांचा पलटवार

Abhijeet Shinde

आदर्श हायस्कूल भामटेच्या मच्छिंद्र कुंभार यांना २०२० चा ग्लोबल टिचर पुरस्कार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!