तरुण भारत

कोल्हापूर जिल्ह्यात आज 8 पॉझिटिव्ह; कोरोना बाधितांची संख्या 655 वर

प्रतिनिधी / कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यात आज गुरूवारी 265 स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह आले. दिवसभरात 8 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले. त्यामुळे पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 655 वर पोहोचली आहे. कागल तालुक्यातील वृद्धेचा सीपीआरमधील कोरोना वॉर्डमध्ये मृत्यू झाला. तिचा स्वॅब रिपोर्ट प्रलंबित आहे. दिवसभरात 10 पॉझिटिव्हमध्ये 2 रिपीट स्वॅबचा समावेश आहे.

Advertisements

परजिल्ह्यातून आलेल्या 1 हजार जणांची गुरूवारी तपासणी केली. त्यापैकी 257 जणांचे स्वॅब घेण्यात आले. सीपीआरमध्ये 75 जणांची तपासणी करून 126 स्वॅब घेतले. आयजीएम हॉस्पिटलमध्ये 62 जणांची तपासणी केली. कदमवाडी येथील डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये 105 जणांची तपासणी केली. आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये 102 जणांची तपासणी केली. गडहिंग्लज उपजिल्हा रूग्णालयात 120 जणांची तपासणी करून 27 स्वॅब घेतले. चंदगड कोरोना केअर सेंटरमध्ये 58 जणांची तपासणी करून 13 स्वॅब घेतले. आजरा केअर सेंटरमध्ये 120 जणांची तपासणी करून 21 स्वॅब घेतले.

राधानगरी कोव्हीड केअर सेंटरमध्ये 13 स्वॅब घेतले. हातकणंगले केअर सेंटरमध्ये 23 जणांची तपासणी केली. कागल केअर सेंटरमध्ये 22 जणांचे स्वॅब घेण्यात आले. भुदरगड येथे 61 जणांची तपासणी करून 16 स्वॅब घेतले. गगनबावडा केअर सेंटरमध्ये 9 जणांची तपासणी केली. पन्हाळा केअर सेंटरमध्ये 18 जणांची तपासणी केली. शाहूवाडीत 30 जणांची तपासणी करून 11 स्वॅब घेतले. शिरोळ केअर सेंटरमध्ये 40 जणांची तपासणी केली. हातकणंगले अतिग्रे एसजीआय केअर सेंटरवर 86 जणांची तपासणी करून 5 स्वॅब घेतले. इचलकरंजीतील डीकेटीई केअर सेंटरमध्ये 60 जणांची तपासणी केली.

सीपीआर हॉस्पिटलमध्ये परजिल्हय़ातून आलेल्या 147 जणांची तपासणी केली. त्यात नवीन 7 संशयित रूग्ण आढळले. आयपीडीमध्ये 182 जणांवर उपचार सुरू आहेत. गुरूवारी सायंकाळपर्यत 172 स्वॅबचे रिपोर्ट आले. त्यातील 169 निगेटिव्ह आहेत तर 3 पॉझिटिव्ह आहेत. सीपीआरमधील कोरोना वॉर्डमध्ये कागल तालुक्यातील बेलेवाडी येथील 70 वर्षीय वृद्धा मंगळवारी उपचारार्थ दाखल झाली. तिचा गुरूवारी पहाटे उपचार सुरू असता मृत्यू झाला. इन्फेक्शन, न्युमोनियाने तिचा मृत्यू झाला आहे. तिचा स्वॅब रिपोर्ट प्रलंबित असल्याची माहिती सीपीआर हॉस्पिटलमधून देण्यात आली.

जिल्हय़ात गुरूवारी रात्री आठपर्यत 278 स्वॅब रिपोर्ट आले. त्यातील 265 निगेटिव्ह आहेत. 10 पॉझिटिव्ह रिपोर्टपैकी 2 रिपीट असल्याने कोरोना बाधितांची संख्या 655 वर पोहोचली आहे. 1 रिजेक्ट केला असून 2 रिपोर्ट प्रलंबित आहेत.

Related Stories

`थेटपाईपलाईन’चे काम मे पर्यंत पूर्ण : पालकमंत्री सतेज पाटील

Abhijeet Shinde

पर्यटन सप्ताहानिमित्त `रेन ऑफ रोडींग रेसर रॅली’

Abhijeet Shinde

सलग दोन दिवस शिरोळ तालुक्यात तेरा पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

रविकांत तुपकरांचं अन्नत्याग आंदोलन स्थगित

datta jadhav

महाराष्ट्रात 15,591 नवे कोरोना रुग्ण; 424 मृत्यू

Rohan_P

पंतप्रधान मोदींचा पत्रकार परिषद न घेण्याचा गुण अधिक आवडतो: खासदार मुंडे

Abhijeet Shinde
error: Content is protected !!