तरुण भारत

अर्जुन पुरस्कारासाठी रशीद, अदिती, दिक्षाची शिफारस

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली :

भारतीय गोल्फ संघटनेने यंदाच्या अर्जुन पुरस्कारासाठी गोल्फपटू रशीद खान, अदिती अशोक व दिक्षा डागर यांची शिफारस केली आहे. रशीद हा जागतिक मानांकन यादीतील सर्वोच्च मानांकित भारतीय आहे तर अदिती ही 2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणारी एकमेव महिला भारतीय गोल्फपटू आहे. तिच्या खात्यावर लेडिज युरोपियन टूरची तीन जेतेपदे नोंद आहेत.

2017 मधील डीफलिम्पिक्सचे रौप्य जिंकणारी दिक्षा ही महिला दक्षिण आफ्रिकन ओपन स्पर्धा जिंकण्यातही यशस्वी ठरली. टोकियो ऑलिम्पिक पात्रतेतही ती आघाडीवर होती. भारतीय युनियन, प्रोफेशनल टूर ऑफ इंडिया व भारतीय महिला गोल्फ फेडरेशनच्या विद्यमाने रशीद, अदिती व दिक्षा यांची शिफारस झाली. रशीदला वैयक्तिक कांस्य पदकाने हुलकावणी दिली असली तरी 2010 ग्वांग्झू आशियाई स्पर्धेत त्याने भारताला सांघिक रौप्य जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला आहे.

10 व्या क्रमांकासह आशियात तो सर्वोच्च मानांकित भारतीय गोल्फपटू असून जागतिक यादीत 185 व्या स्थानासह तो अव्वल भारतीय ठरला आहे. 2014 आशियाई टूरमध्ये त्याने दोन जेतेपदे मिळवली. प्रथमश्रेणी स्तरावरही त्याने आठ स्पर्धा जिंकल्या.

Related Stories

थिएम बनला नवा ग्रँडस्लॅम विजेता

Patil_p

स्पेनचा नदाल उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

कोरोनामुळे दोन पात्र फेरीच्या क्रिकेट स्पर्धा लांबणीवर

Patil_p

धोनीचा झारखंड संघासमवेत सराव

Patil_p

राष्ट्रीय क्रिकेट हंगामात कोरोनामुळे कपात

Patil_p

जयदेव उनादकटकडे सौराष्ट्राचे नेतृत्व

Omkar B
error: Content is protected !!