तरुण भारत

गुजरातमध्ये काँग्रेसच्या आणखी एका आमदाराचा राजीनामा

ऑनलाईन टीम / गांधीनगर : 

राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर गुजरातमध्ये काँग्रेसच्या आणखी एका आमदाराने आज राजीनामा दिला. मार्चपासून गुजरातमध्ये काँग्रेसच्या आठ आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे काँग्रेसला चांगलाच धक्का बसला आहे. 

Advertisements

बृजेश मेरजा असे आज राजीनामा दिलेल्या आमदाराचे नाव आहे. काल आमदार जितू चौधरी आणि अक्षय पटेल यांनी विधानसभा अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांच्याकडे आपले राजीनामे सोपवले आहेत.  राज्यसभेच्या 4 जागांसाठी 19 जुलैला गुजरातमध्ये निवडणूका होणार आहेत. त्यासाठी भाजपचे 3 तर काँग्रेसचे 2 उमेदवार रिंगणात आहेत. 

निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे संख्याबळ कमी झाले आहे. संख्याबळ कमी झाले नसते तर भाजप आणि काँग्रेसचे दोन उमेदवार निवडून आले असते. दोन जागा निवडून आणण्यासाठी काँग्रेसकडे काठावरचे संख्याबळ होते. मात्र, आता संख्याबळ कमी झाल्याने तिसरी जागाही भाजपकडे जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

राज्यसभेच्या 4 जागांसाठी 5 जण रिंगणात आहेत. भाजपने अभय भारद्वाज, रमिला बारा आणि नरहरी अमीन यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसने शक्तींसिह गोहिल आणि भरतसिंग सोलंकी यांना रिंगणात उतरवले आहे. 

Related Stories

अप्रकाशित समाजसेवकांचा शोध घ्या

Patil_p

‘पार्टी फॉर द फॅमिली, पार्टी बाय द फॅमिली’…, नाव न घेता मोदींचा काँग्रेसवर निशाणा

datta jadhav

डेहराडून बलात्कार प्रकरणी 20 वर्षांची शिक्षा

Patil_p

INS ‘रणवीर’मध्ये स्फोट; 3 जवान शहीद

datta jadhav

Tokyo Olympics : टेबल टेनिस- मनिका बत्राचा शानदार विजय

Abhijeet Shinde

नदीत बुडालेल्यांचा शोध घेणारे उपकरण

Patil_p
error: Content is protected !!