तरुण भारत

राशिवडेत परप्रांतीय महिलेची आत्महत्या

वार्ताहर / राशिवडे

मुळची केरळ येथील तर राशिवडे(ता.राधानगरी) येथील इंदीरनगर वसाहत येथे राहणाऱ्या शिवेगामी सर्वराज मारवार वय३५ या विवाहित परप्रांतीय महिलेने आत्महत्या केली.कौटुंबिक वादातून ही आत्महत्या झाल्याची चर्चा असुन ही घटना काल रात्री ८.३० च्या दरम्यान घडली.
याबाबतची मिळालेली माहीत अशी, सर्वराज गुलस्वामी मारवार रा .केरळ हा आपल्या पत्नीसोबत विक्रम डकरे यांच्या घरी भाड्याने राहत होता. भांडी विकण्याचा त्याचा व्यवसाय असुन त्याची पहिली पत्नी केरळ येथे राहत असुन सर्वराजने शिवेगामीसोबत प्रेमविवाह केला होता.परंतु काही दिवसापासुन सर्वराजला दारुचे व्यसन लागले होते,त्यामुळे या दोघांमध्ये वादविवाद होत.काल सायंकाळी ६वा. सर्वराजने पत्नीकडुन दोनशे रुपये घेतले व दारु पिण्यासाठी निघाला,त्यावेळी दारु पिऊ नको म्हणून शिवगामीने सांगितले. परंतु सर्वराज निघुन गेला.

Advertisements


रात्री ८ च्या दरम्यान तो घरी परतला असता स्लॅबच्या हुकला साडी अडकुन गळफास लाऊन  शिवगामीने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर घरमालक विक्रम डकरे, सरपंच क्रष्णात पोवार, पो.पाटील उतम पाटील यांनी या घटनेची माहिती पो.नि.उदय डुबल यांना दिली. मृतदेहासोबत सर्वराजला घेऊन सी.पी.आर.येथे शवविच्छेदन करण्यात आले, तर पंचगंगा स्मशानभूमीत अंतीम संस्कार करण्यात आले. सदर घटनेची नोंद राधानगरी पोलीस ठाण्यात झाली आहे.

Related Stories

जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष भिमराव मोहिते यांना पत्नी शोक

Abhijeet Shinde

बार्शी शहरात दोन तर वैरागमध्ये सपडला एक कोरोना रुग्ण

Abhijeet Shinde

पानिपतमध्ये उद्या मराठा शौर्य दिन

Sumit Tambekar

सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल २६० कोरोना पॉझिटीव्ह

Abhijeet Shinde

कुंभोज परिसरातील शेतीत लाखोंचे नुकसान, पंचनामे करण्याची मागणी

Abhijeet Shinde

सातारा जिल्ह्यातील ९५ संशयितांचे अहवाल कोरोना बाधित

Abhijeet Shinde
error: Content is protected !!