तरुण भारत

झेकमध्ये पुढील आठवडय़ात प्रेक्षकांच्या उपस्थितीत टेनिस स्पर्धा

वृत्तसंस्था/ प्राग्यु

कोरोना महामारी संकटामुळे जवळपास तीन महिन्यांच्या कालावधीत आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनने एटीपी आणि डब्ल्यूटीए टूरवरील सर्व स्पर्धा स्थगित किंवा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडमधील विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा रद्द करण्यात आली असून प्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धा सप्टेंबरपर्यंत लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर टेनिस स्पर्धा पूर्णपणे स्थगित करण्यात आल्या आहेत. कोरोना परिस्थितीत विविध देशांमध्ये थोडीफार सुधारणा होत असल्याने काही टेनिसपटूंनी आपल्या सरावाला बंदिस्त स्टेडियममध्ये प्रारंभही केला आहे. झेकमध्ये पुढील आठवडय़ात महिलांची मदतनिधी टेनिस स्पर्धा भरविली जाणार असून या स्पर्धेवेळी शौकिनांची उपस्थिती राहणार आहे.

Advertisements

या मदतनिधी महिलांच्या टेनिस स्पर्धेत दोन संघांचा समावेश असून प्रत्येक संघात 6 टेनिसपटूंचा सहभाग राहणार आहे. कॅरोलिना प्लिस्कोव्हा आणि क्विटोव्हा या झेकच्या महिला टेनिसपटू या संघांचे नेतृत्व करणार आहेत. सदर स्पर्धा 13 ते 15 जून दरम्यान घेतली जाईल. या स्पर्धेसाठी झेक शासनाने 500 शौकिनांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. सदर स्पर्धेत मुचोव्हा, मार्टिनकोव्हा, स्ट्रायकोव्हा, सिनियाकोव्हा, पेजीकोव्हा, रशियाची ऍलेक्सझंड्रोव्हा यांचा समावेश आहे. गेल्या आठवडय़ात झेक प्रजासत्ताकच्या टेनिस हंगामाला प्रारंभ करण्यात आला. या हंगामातील पहिली स्पर्धा बंदिस्त टेनिस कोर्टमध्ये भरविली गेली आणि ही स्पर्धा झेकच्या क्विटोव्हाने जिंकली होती.

Related Stories

ऑस्ट्रेलियाच्या हिलीकडून धोनीचा विक्रम मोडीत

Patil_p

आर्थिक-मानसिक परिस्थितीवर परिणाम होण्याची भीती : एचएस प्रणॉय

Patil_p

भारतीय संघासमोर आव्हानांचा डोंगर

Patil_p

2026 च्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धा केंद्रांची निवड लांबणीवर

Patil_p

कझाकस्तानमधील लीग फुटबॉल स्पर्धा तहकूब

Patil_p

गोल्फपटू लाहिरीचेही 7 लाख रुपयांचे योगदान

Patil_p
error: Content is protected !!