तरुण भारत

बेळगाव-मुंबई विमानसेवा आजपासून होणार पूर्ववत

प्रतिनिधी/ बेळगाव

लॉकडाऊनमुळे बंद असलेली विमानसेवा मे अखेरपासून सुरू झाली. परंतु महाराष्ट्र सरकारने मुंबईमधून परवानगी न दिल्यामुळे बेळगाव ते मुंबई ही विमानसेवा बंद होती. तब्बल 72 दिवसांनी पुन्हा एकदा बेळगाव ते मुंबई हा विमानप्रवास करता येणार आहे. स्टार एअरने आठवडय़ातून एकदा ही सेवा उपलब्ध करून दिली असून शनिवार दि. 6 जूनपासून ती पूर्ववत होणार आहे.

Advertisements

बेळगावच्या सांबरा विमानतळावरून 25 मे पासून काही शहरांना विमानसेवा पूर्ववत करण्यात आली आहे. परंतु मुंबई शहराला विमानसेवा केव्हा सुरू होणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. महाराष्ट्रातील पुणे शहराला विमानसेवा पूर्ववत झाली पण मुंबईला नसल्याने वारंवार विचारणा करण्यात येत होती. अखेर बेळगाव विमानतळ प्राधिकरणाकडून ट्विट करून मुंबईला 6 जूनपासून विमानसेवा सुरू करीत असल्याचे कळविले होते.

प्रत्येक शनिवारी असणार विमानसेवा

प्रत्येक शनिवारी स्टार एअर मुंबई शहराला विमानसेवा देणार आहे. दुपारी 1.35 वा. बेळगाववरून उड्डाण घेतलेले विमान 2.40 वा. मुंबईला पोहोचणार असल्याचे स्टार एअरने कळविले आहे. यामुळे बेळगाव-मुंबई असा प्रवास करणाऱया प्रवाशांची सोय होणार आहे. बेळगाववरून अद्याप मुंबईला रेल्वे उपलब्ध नसल्याने विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्मयता वर्तविण्यात येत आहे.

बंद असलेली विमानसेवा हळूहळू पूर्वपदावर येताना दिसत आहे. शुक्रवारी दिवसभरात बेंगळूर, अहमदाबाद, पुणे, हैद्राबाद व म्हैसूर या शहारांमधून प्रवासी बेळगावमध्ये दाखल झाले. प्रवाशांच्या संख्येतही हळूहळू वाढ होताना दिसत आहे.

Related Stories

शेतकऱयांना चिरडून मारणाऱया भाजपचा तीव्र निषेध

Amit Kulkarni

उपनोंदणी कार्यालय आहे त्या ठिकाणीच हवे

Patil_p

चिकोडी उपविभागाला महापुराचा विळखा

Patil_p

’आहार, विहार व विचार हे आरोग्याचे तीन स्तंभ

Omkar B

हेम्माडगा-तालुका हद्दीपर्यंतच्या रस्त्याचा तातडीने विकास करा

Omkar B

प्लास्टिकचा वापर आढळल्यास कठोर कारवाई

Omkar B
error: Content is protected !!