तरुण भारत

पेडणे तालुका उपजिल्हाधिकाऱयांशी विर्नोडा पंचायत मंडळाची चर्चा

पेडणे / प्रतिनिधी

सरकारने म्हापसा येथील सरकारी जिल्हा इस्पितळात सुरु असलेल्या कोरोना स्वॕब केंद्रावर अतिरिक्त ताण पडत असल्याने पञादेवी येथे गोव्यात प्रवेश करणाऱया व्यक्तीसाठी विर्नोडा पेडणे  येथील सरकारी महाविद्यालयात स्वॕब  केंद्र सुरु करण्याचा निर्णय   घेतल्याने सरकारने विर्नोडा पंचायतीला अंधारात ठेवून निर्णय घेतल्या नंतर यासंबंधी विर्नोडा पंचायतमंडळाने  पेडणे उपजिल्हाधिकारी यांना पञ पाठवून विरोध केला होता.माञ या विरोधाला न जुमानता हे केंद्र सुरु करण्याचे आदेश उत्तर गोवा  जिल्हाधिकारी यांनी दिल्याने शुक्रवारी पेडणे तालुका उपजिल्हाधिकारी श्री .निपाणीकर  यांची भेट घेऊन या स्वॕब केंद्राला नागरिकांच्या जीवाला धोका असल्याचे सांगून हे केंद्र अन्य ठिकाणी न्या अशी मागणी केली.

Advertisements

विर्नोडा सरपंच प्रशांत राव , उपसरपंच अपर्णा परब ,पंच भरत गावडे, शैलेश राव, मंगलदास किनळकर, अनुपा कांबळी व नागरिक प्रेमनाथ धारगळकर हे यावेळी उपस्थित होते.

  यावेळी सरपंच प्रशांत राव व इतर पंचसदस्यानी पंचायतीने आपल्या कार्यालयाला पञ देऊन स्वॕब केंद्र महाविद्यालयात सुरू करण्यास विरोध असल्याचे कळविले होते.पंचायतीला अंधारात ठेवून विश्वासत न  घेता हे केंद्र सुरू करण्याचा निर्णय योग्य नसल्याचे सांगून गावात यामुवृ भितीचे वातावरण निर्माण झाल्याने हे केंद्र या ठिकाणी सुरु करु नये असे सांगितले .यावर केंद्र सुरु करण्याचा निर्णय हा वरि÷ पातळीवर घेण्यात येतो.यामुळे तिथली सर्व सुरक्षेचा विचार सरकारी पातळीवर केला आहे असेपेडणे उपजिल्हाधिकारी निपाणीकर यांनी सांगितले .जर काही समस्या असल्यास त्या सांगाव्यात त्या सोडविल्या जातील असे त्यांनी सांगितले .

Related Stories

प्रतापराव हवालदार यांचे निधन

Amit Kulkarni

चांगल्या विचारांचे उमेदवार पालिकेवर निवडले जावेत

Amit Kulkarni

स्पोर्ट्स सेंटरचे जयेश साळगांवकर यांच्याहस्ते उद्घाटन

Patil_p

राज्यात हळूहळू लोकांची लगबग सुरु

Omkar B

आपतर्फे आजपासून विज आंदोलन

Patil_p

गोव्याचे आर्थिक भवितव्य केंद्र सरकारच्या हाती

Omkar B
error: Content is protected !!