तरुण भारत

हडफडे सरपंचपदी राजेश मोरजकर बिनविरोध

पंचायत घर, सभागृह उभारण्यास प्राधान्य

प्रतिनिधी / पणजी

Advertisements

हडफडे नागवा पंचायतीच्या सरपंचपदी राजेश रामदास मोरजकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. एक वर्षांच्य करारानुसार मावळत्या सरपंच दिपीका रेशन रेडकर यांनी आपल्या पदाचा राजिनामा देण्यावर हे पद रिक्त झाले होते. नवनिर्वाचित सरपंच म्हणून मोरजकर यांची निवड झाल्यावर कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी पंचायतीमध्ये येऊन सरपंचाना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

यावेळी पंचसदस्य श्रीकृष्ण नागवेकर, दिपीका रेडकर, विद्याधर दिवकर, सलीम सय्यद, सखाराम नाईक, उपस्थित होते. उपसरपंच ऑलांता डिसौजा आजारी असलयाने उपस्थित राहू शकल्या नाही.

मंत्री लोबोकडुन सरपंचाचे अभिनंदन

यावेळी बोलताना मंत्री मायकल लोबो म्हणाले की, पंचायत मंडळाने यापूर्वीच गटविकास अधिकारी, प्लेनिंग डेव्होलोपींग थॅरोपी, पंचायतीने यास मान्यता दिली आहे. पीआयडीसीतर्फे हे घर पर्रापंचायतीप्रमाणे बांधण्यात येणार आहे. दरम्यान एक पंचायत सभागृह, आरोग्य कार्यालयासाठी जागा, माजी सरपंच श्रीकृष्ण नागवेकर यांच्याप्रयत्नाने पंचायतीसाठी दान केलेली आहे. आरडीयेमार्फत त्वरित सभागृह उभारण्यात येईल. चांगले काम करा नागरिकांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल मावळत्या सरपंच दिपकानेही आपल्या कारकीर्दीत चांगले काम केल्याचे सांगून त्याही अभिनंदनास पात्र असल्याचे मंत्री लोबो यांनी सांगितले.

पंचायत घर, सभागृहास प्राधान्य – सरपंच राजेश मोरजकर

नवनिर्वाचित सरपंच राजेश मोरजकर म्हणाले की, पंचायत घर व पंचायत सभागृह हे दोन प्रकल्प बाकी असून त्या सर्वप्रथम हाती घेण्यात येईल. मंत्री मायकल लोबो यांच्या सहकार्याने ते पूर्णत्त्वास नेण्यात येईल तसेच आमच्या शालेचे मैदान, कुंपण, बसण्यासाठी व्यवस्था, आदी आरडील मार्फत कामे हाती घेण्यात येईल याची निविदाही झाली आहे. रस्ता रूंदीकरण आदी कामे त्वरित हाती घेण्यात येईल. माझे सीमवाडा तसेच मायणाभाटीच्या नागरिकानी मला निवडून दिल्याने व मंत्री लोबो यांच्या सहकार्याने आपण सरपंच झाल्याने त्यानी त्यांचे आभार मानले.

Related Stories

वालावलकर कुटुंबियाच्या श्रावणी शनिवार उत्सवाची शंभरी

Amit Kulkarni

सहाय्यक जेलरसह दोन जेलगार्ड निलंबीत

Omkar B

शिक्षकांविना शाळा पडल्या ओस

Amit Kulkarni

पालकांना भेटण्यास आलेला युवक अपघातात ठार

Amit Kulkarni

फोंडा मतदार संघात ‘कमळ’ फुलणार !

Patil_p

मुरगाव बंदरात ‘नॅचरल गार्नेट’चे 24 कंटेनर डीआरईकडून जप्त

Patil_p
error: Content is protected !!