तरुण भारत

सत्तरीतही कोरोनाचा प्रवेश

गुळेली, मोर्ले येथे दोघे पॉझिटिव्ह

वाळपई / प्रतिनिधी

Advertisements

राज्याच्या मुख्य भागापासून अनेक किलोमीटर अंतरावर असलेल्या सत्तरी तालुक्मयातही आता कोरोनाने प्रवेश केला आहे. शुक्रवारी तालुक्मयातील मोर्ले व गुळेली या दोन्ही गावांमध्ये प्रत्येकी एक रुग्ण सापडल्यामुळे तालुक्यात खळबळ माजली आहे.

 कालचा शुक्रवार सत्तरी तालुक्मयासाठी वाईट दिवस ठरला. आरोग्य खात्यात काम करणाऱया एका कर्मचाऱयाला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले असून यामुळे तालुक्मयात प्रचंड प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर रुग्ण मोर्ले येथे राहणारा आहे. तो वास्कोत कोरोना नियंत्रण कार्यात होता. तेथेच लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गुळेली येथेही एक रुग्ण सापडल्याने लोकांची चिंता वाढली आहे.

 वाळपईत हे वृत्त थडकताच तालुक्याच्या अनेक गावांतून लोकांचे विचारणा करणारे फोन येऊ लागले. सोशल मीडियावरुनही मेसेज फिरु लागले. खबरदारीची उपाययोजना म्हणून या रुग्णांच्या कुटुंबीयांची तपासणी करण्यात आल्याची माहिती मिळाली. दोन रुग्ण सापडल्याने सरकारने ही बाब अत्यंत गांभीर्याने घेऊन याठिकाणी विशेष नियंत्रण प्रक्रिया राबविण्याची मागणी नागरिकांनी केलेली आहे. गुळेली व मोर्ले या दोन्ही गावांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Stories

कोरोन्टाईनच्या नावाखाली पोलिसांनी रात्रभर गोमंतकीय विद्यार्थ्यांना मोले चेकपोस्टवर अडवून ठेवले

Omkar B

एनजीओ, डायलेसीस रुग्णांना मदतनिधी

Omkar B

बुधवारी कोरोनाचे 4 बळी

Omkar B

फोंडा, तिसवाडीला भोवणार पाणी टंचाई

Amit Kulkarni

मडगाव पालिकेत दिपाली सावळ यांचा विक्रम

Amit Kulkarni

जनसुनावणीला हरित लवादासमोर आव्हान देणार

Amit Kulkarni
error: Content is protected !!