तरुण भारत

राज्याची आर्थिक स्थिती बिकट

लॉकडाऊनमुळे मिळकत 80 टक्क्यांनी घटली : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रथमच केले मान्य

प्रतिनिधी / पणजी

Advertisements

राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल शुक्रवारी पहिल्यांदाच मान्य केले. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे राज्याची मिळकत 80 टक्क्यांनी कमी झाल्याचा गौप्यस्पोट त्यांनी केला.

पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी आजपर्यंत आर्थिक स्थिती भक्कम असल्याचे म्हटले होते. परंतु आता राज्याच्या महसुलात 80 टक्के घट झाल्याचे प्रथमच त्यांनी मान्य केले आणि आता कठोर पावले उचलल्याशिवाय तरणोपाय नसल्याचे स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राज्याच्या या परिस्थितीस लागून आता आपण मोठय़ा प्रमाणात काटकसरीच्या उपाययोजना आखणार आहे आणि यासंदर्भात जे काही निर्णय घ्यावयाचे आहेत ते येत्या बुधवारी जाहीर केले जातील. मुख्यमंत्र्यांच्या या निवेदनाने राज्य आता आर्थिक डबघाईला पोहोचले असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

उपलब्ध माहितीनुसार येत्या बुधवारी मुख्यमंत्री अत्यंत महत्वाची मंत्रीमंडळ बैठक घेणार असून त्यात ते फार कठोर निर्णय घेण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने गेल्या 10 दिवसात 300 कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. आगामी काही दिवसांमध्ये राज्याला आणखी बरेच कर्ज घेणे भाग पडणार आहे.

Related Stories

गोव्याच्या बाजारपेठेत आता ‘गोवा गोल्ड’ दूध

tarunbharat

पद्मभूषण लक्ष्मण पै यांना जाहीर झालेला विद्याधीराज पुरस्कार आकाश पै यांनी स्वीकारला

Amit Kulkarni

राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस

Patil_p

कोकणी-हिंदी राष्ट्रीय परिसंवादाला फर्मागुडीत प्रारंभ

Patil_p

गॅरेंजमालकही खाणी सुरू होण्याच्या प्रतिक्षेत

Patil_p

शिरोडा मतदारसंघात मार्चपर्यंत दीडशे कोटींची विकासकामे

Patil_p
error: Content is protected !!