तरुण भारत

कोरोनाच्या धास्तीने एकाची आत्महत्या; आटपाडी तालुक्यातील घटना

आटपाडी / प्रतिनिधी

गावात आणि घराशेजारी कोरोना बाधित रुग्ण आढळल्यामुळे भीतीच्या सावटातच शेटफळे येथील एका ज्येष्ठ नागरिकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. कोरोनाच्या भीतीने दोन दिवस सदर व्यक्ती अस्वस्थ होती, त्यांना अनेकांनी धीर देण्याचा प्रयत्नही केला पण कोरोनाची प्रचंड दहशत निर्माण झाल्याने दिगंबर कृष्णा खांडेकर (वय 68) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथे एसटी चालक आणि त्यांची दोन मुले कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहेत. गावातील बावीस मुलांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील तिघांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यात दिगंबर खांडेकर यांच्या नात्यातील एकाचा समावेश आहे. घराशेजारीच कोरोना रुग्ण आढळल्याने आणि नात्यातील एका तरुणाचा स्वॅब घेण्यात आल्यामुळे खांडेकर हे प्रचंड अस्वस्थ होते. त्यांनी याबाबत कुटुंबात भीती ही व्यक्ती केली होती.
आपल्या शेजारी आणि घरात कोरोना आला आहे. आता जगणे कठीण आहे, अशा भावना ते बोलून दाखवत होते.

अस्वस्थ वाटणाऱ्या दिगंबर खांडेकर यांना आरोग्य सेवक यांनी भेट देऊन चौकशी केली. आपत्ती व्यवस्थापन समिती, पोलीस पाटील व मान्यवरांनीही खांडेकर यांचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. कोरोनाची भीती मनात बिंबल्याने ते सातत्याने त्याबाबत बोलत राहिले. त्याच अस्वस्थतेमध्ये घरासमोरील झाडाला गळफास घेऊन दिगंबर खांडेकर यांनी आत्महत्या केली. या घटनेने शेटफळेसह तालुक्यात खळबळ माजली असून हळहळ व्यक्त होत आहे.

Advertisements

Related Stories

सातारा : सणबुर विलगीकरण कक्षातील महिलेचा मृत्यू

Abhijeet Shinde

”मी काही विजय माल्या वा नीरव मोदी नाही, ईडीने कारवाई केली म्हणून गायब होणार”

Abhijeet Shinde

सांगली : नऊ जणांचा मृत्यू ,252 रूग्ण वाढले

Abhijeet Shinde

पुणे आग दुर्घटना : 18 जणांचा होरपळून मृत्यू

Rohan_P

कोल्हापूर जिल्हय़ात कोरोनाचे ९ बळी, ३०२ पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना अभिवादन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!