तरुण भारत

मोटर सायकल व मोबाईल चोरी करणाऱ्या शिरोळच्या दोघांना अटक

प्रतिनिधी / शिरोळ

मोटर सायकल व मोबाईल चोरी करणाऱ्या शिरोळच्या दोघांना अटक करण्यात आले. यांचे आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून 37 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Advertisements

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की शिरोळ येथील बाळासो वसंत पोकळे हे 28 मे रोजी रात्री अंगणात झोपले होते त्यावेळी उशाजवळ ठेवलेले दोन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली असल्याची फिर्याद दिली होती.

पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस हेडकॉन्स्टेबल डी. डी सानप पोलीस कॉन्स्टेबल ताहीर मुल्ला व पोलीस नाईक हनुमंत माळी हे पाच जून रोजी शिरोळ येथील मार्केट परिसरात गस्त घालीत असताना मोहन भिमराव इंगळे पाटील वय वर्ष एकतीस व सचिन शहाजी पाटील वय वर्षे 28 हे दोघे राहणार शिरोळ हे ऍक्टिवा मोटर सायकलवरून संशयास्पद फिरत होते. पोलिसांना संशय आल्याने त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता दोन मोबाईल व दोन जून रोजी जयसिंगपूर एसटी स्टँड परिसरात लावण्यात आलेली ऍक्टिवा मोटर सायकल चोरी केल्याची कबुली दिली. या दोघांच्याकडून आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल डी. डी. सानप, ताहीर मुल्ला व हनुमंत माळी हे करीत आहेत.

Related Stories

कोल्हापूर जिल्ह्यात 13 नवे रूग्ण, 3 कोरोनामुक्त

Abhijeet Shinde

शिरोळ तालुका सरपंच आरक्षणात अनेकांना लागली लॉटरी तर अनेकांचे पत्ते कट

Abhijeet Shinde

कोरोना लसीची रंगीत तालिमची साताऱयाला प्रतिक्षा

Patil_p

अंबाबाईच्या दर्शनाला भाविकांची अलोट गर्दी

Abhijeet Shinde

हत्तीप्रवण भागातील शेतकऱयांना तात्काळ नुकसान भरपाई

Abhijeet Shinde

रस्ते खुदाईवरुन सत्ताधारी गटातच ठिणगी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!