तरुण भारत

घरोघरी भगवा ध्वज देवून शिवराज्यभिषेक दिन साजरा

किल्ले अजिंक्यताऱयावर शिवराज्यभिषेक उत्सव समितीने जावून केले अभिवादन

प्रतिनिधी/ सातारा

Advertisements

राजधानी साताऱयात गेल्या एक तपाहून अधिक वर्षे श्री शिवराज्यभिषेक दिन उत्सव समिती तिथीनुसार शिवराज्यभिषेक दिन साजरा करते. दरवर्षी राजधानी सातारा ते राजधानी रायगड अशी मोहिम राबवण्यात येते. पंचनद्याचे जल नेवून रायगडावर जलभिषेक करण्यात येतो. यावर्षी लॉकडाऊनमुळे शिवराज्यभिषेक उत्सव समितीने राजधानी किल्ले अजिंक्यतारा येथे जावून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करुन घरातच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला जलाभिषेक करुन शिवभक्तांना भगवे ध्वज वाटप करण्यात आले.

याबाबत माहिती देताना शिवराज्यभिषेक उत्सव समितीचे सुदामदादा गायकवाड म्हणाले, काल, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी” म्हणजेच तिथीनुसार श्री शिवराज्याभिषेक दिन होता. सातारच्या श्री शिवराज्याभिषेक दिन उत्सव समिती, राजधानी, सातारा या वतीने 12हुन अधिक वर्षे शहरात मोठे उत्सव झाले. सातारा ही राजधानी ! आणि रायगड येथे शिवरायांवर राज्याभिषेक झाला. या दोन्हीतील नातं आणखी घट्ट राहावं म्हणून समितीच्यावतीने राजधानी ते राजधानी ही मोहीम राबण्यात येत आहे. त्यातून राजधानी साताऱयातून एक जलकुंभ दुरदुर्गेश्वर रायगड येथे नेण्याची परंपरा निर्माण केली गेली. किल्यांची राजा असलेल्या रायगडावर भल्या पहाटेच्या मुहूर्तावर छत्रपती शिवरायांच्या मूर्तीवर याच जलकुंभातून आणलेल्या सातारा जिह्यातील नद्यांचा जलाभिषेक होताना आसमंतात न समावणारा उत्साह निर्माण होऊन जयजयकाराच्या ललकारी देताना आम्हा सातारकरांचा ऊर भरून पावत असतो. सध्या जे वैश्विक वास्तव समोर आहे. त्यामुळे यंदा समिती रायगडावर जाणार नाही असं काही जाहीर करण्यापेक्षा मनोमन अभिवादन करुन घरोघर राज्यभिषेक दिन साजरा करण्यात आला.

 त्या राजधानी ऐवजी या राजधानीवर पोहोचून छत्रपती शिवराय व छत्रपती शाहूमहाराज यांना अभिवादन केले. समितीच्या शिवमूर्तीला अभिषेक केला. घरोघर राज्यभिषेक दिन साजरा व्हावा म्हणून प्रातिनिधिक स्वरूपांत अनेक घरांना शिवस्वराज्याचे प्रतीक म्हणून भगवे ध्वज देण्यात आले. यावेळी समितीचे मार्गदर्शक दीपक प्रभावळकर, स्मितल प्रभावळकर, अद्वैत प्रभावळकर यांच्यासह शिवभक्त सहभागी झाले होते.

Related Stories

खबरदारी म्हणून स्थलांतराची तयारी!

triratna

मुंबई ते बेंगलोर मार्गावरील विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ

triratna

नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड वसुल

Patil_p

पाडळी येथे जुगार अड्ड्यावर छापा ; ३६,८००रु.चा मुद्देमाल जप्त

triratna

मुंबईहून आलेले ‘ते’ बारा जण हद्द वादात अडकले

triratna

दुचाकी अपघातात तिघेजण जखमी

Patil_p
error: Content is protected !!