तरुण भारत

प्रियदर्शन जाधवचे वेबदुनियेत पदार्पण

खरं काय खोटं काय याचा कधी विसर पडलाय का तुम्हाला किंवा कोणी सतत पाठलाग करतंय अस जाणवलं आहे का? असच काही झालंय ते म्हणजे लवकर लग्नाच्या बेढीत अडकणाऱया रायबासोबत, ज्याच्या भाग्यात शिवानीच नाव योग्य जोडीदार म्हणून लिहिलं आहे. पण त्याला त्याच्या लग्नाच्या विधीत सतत दिसते आहे ते अनोळख्या मुलीचं भूत जी आहे सुधा. भुताटलेला या आगळ्यावेगळ्या वेबमालिकेत अभिनेता प्रियदर्शन जाधव प्रमुख भूमिकेत आहे. यानिमित्ताने त्याने वेबदुनियेत पदार्पण केले आहे.

मराठी चित्रपटसफष्टीत टाईमपास, हलाल, चोरीचा मामला अश्या उत्तमोत्तम चित्रपटातून प्रेक्षकांची मन जिंकलेला प्रियदर्शन जाधव या वेब सीरिजमधून वेबच्या दुनियेत पाऊले ठेवतो आहे. मराठी प्रेक्षकांच्या मनात आपल्या उत्तम अभिनयाने घर केलेल्या प्रियदर्शनने आजवर अनेक वेगवेगळय़ा भूमिकेतून स्वत:ला सिद्ध केले आहे. कॉमेडी पासून गंभीर चित्रपटातून स्वत:ला सिद्ध करणारा प्रियदर्शनची भुताटलेला ही हॉरर कॉमेडी सीरिज मराठी सोबतच हिंदीमध्ये सुद्धा आपल्याला पाहता येणार आहे. शिवाजी लोटन पाटील या तरुण दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलेली ही सीरिज रायबा आणि शिवानी यांच्या लग्नाच्या आधी घडलेल्या घटनेवर आहे. प्रियदर्शन जाधव या सीरिजमध्ये रायबाच्या भूमिकेत तर शिवानीच्या भूमिकेत सुरभी हांडे दिसणार आहे. रायबाच्या हळदीच्या दिवशी तो भुता प्रेतांना दूर ठेवण्यासाठी आईने दिलेली कटय़ार विसरतो त्याचवेळी त्याला जाणवत की कोणीतरी अज्ञात त्याचा पाठलाग करतंय. प्रियदर्शन जाधव, सुरभी हांडे यांच्या सोबतच योगेश सिरसाट, सुनील होळकर आणि सायली पाटील हे सुद्धा या सीरिज मध्ये आपल्याला महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. रायबासोबत नंतर काय काय होणार याचे रहस्य एमएक्स प्लेयरच्या या मालिकेत उलगडणार आहे. ही वेबमालिका नि:शुल्क पाहता येणार आहे.

Related Stories

सिट्रोनची अत्याधुनिक कार लवकरच येणार

Amit Kulkarni

स्मिता तांबेने शेअर केल्या पहिल्या फोटोशूटच्या आठवणी

Patil_p

अभिनेता विवेक ओबेरॉय विरोधात गुन्हा दाखल

pradnya p

‘आदिपुरुष’च्या चित्रिकरणास मुंबईत प्रारंभ

Patil_p

बंगाली अभिनेत्री कोयल मल्लिकला कोरोनाची बाधा

pradnya p

शाहरूख खानच्या क्लास ऑफ 83 मध्ये मराठमोळा पृथ्विक प्रताप

Patil_p
error: Content is protected !!