तरुण भारत

सागर घेतोय ऑनलाईन गिटारचे धडे

टाळेबंदीमुळे मालिकांचे चित्रीकरण बंद असून सर्व कलाकार देखील घरी त्यांच्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. चित्रीकरणाच्या त्यांच्या बिझी शेडय़ुलमधून त्यांना मिळालेली ही मोठी सुट्टीच आहे. त्यात अनेक कलाकार त्यांची आवड-निवड जपत आहेत. चला हवा येऊ द्या या प्रेक्षकांच्या आवडत्या कार्यक्रमातील त्यांचा लाडका विनोदवीर सागर कारंडे सध्या त्याच्या कुटुंबाला मनसोक्त वेळ देतोय. चला हवा येऊ द्या च्या चित्रीकरणामुळे एरवी घरी इतका वेळ देता येत नसल्यामुळे आता सागर मुलीसोबत खेळण्यात, तिच्यासोबत मस्ती करण्यात व्यस्त आहे.

या मिळालेल्या मोकळय़ा वेळात सागर अजून काय करतोय हे विचारल्यावर तो म्हणाला, मी नवनवीन गोष्टी शिकतोय. पहिलं म्हणजे स्वयंपाक. सुरुवातीला मला फक्त ऑमलेट बनवता येत होतं पण आता मी बऱयापैकी स्वयंपाक करू शकतो. हळद-मिठाचं प्रमाण देखील आता मला कळू लागलं आहे. आधी माझे खूप सारे प्रयोग फसले पण आता हळूहळू मला अंदाज येऊ लागला आहे. शिवाय मी गिटारचे ऑनलाईन धडे गिरवतोय. आधीपासून मी गिटार शिकत होतो पण नंतर वेळ न मिळाल्यामुळे खंड पडला होता. गिटारदेखील बरेच दिवस धूळ खात पडली होती. सध्या माझा एक मित्र मला ऑनलाईन गिटार शिकवतोय. तसेच दुसरीकडे माझं लिखाण देखील चालू आहे. याशिवाय काही चित्रपट जे वेळेअभावी बघायला नाही मिळाले त्या चित्रपटांचा मी आस्वाद घेतोय, असे सागरने सांगितले.

Advertisements

Related Stories

अभिनेत्री मौनी रॉय विवाहबद्ध

Sumit Tambekar

अनन्या पांडेच्या चौकशीनंतर NCB चा मोठा खुलासा

Abhijeet Shinde

अंगिरा झळकणार आंतराष्ट्रीय चित्रपटात….

tarunbharat

‘मंगलाष्टक रिटर्न’मध्ये वृषभ-शीतलची जोडी

Patil_p

‘भौकाल 2’चा टीझर प्रदर्शित

Amit Kulkarni

कंगना रानौतच्या सुरक्षेबाबत हिमाचल प्रदेश सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

Rohan_P
error: Content is protected !!