तरुण भारत

अफगाण क्रिकेटपटूंच्या सरावाला प्रारंभ

वृत्तसंस्था/ काबूल

कोरोना महामारी संकट सुरू असताना अफगाणिस्तानमध्ये अव्वल क्रिकेटपटूंच्या प्रशिक्षण सराव शिबिराला काबूल क्रिकेट स्टेडियमवर फेरप्रारंभ करण्यात आल्याची माहिती अफगाण क्रिकेट मंडळाने दिली आहे.

अफगाणच्या अव्वल क्रिकेटपटूंचा या सराव शिबिरात समावेश असून रशिद खान आणि मोहंमद नबी यांनी रविवारी या शिबिरात आपला सहभाग दर्शविला. सदर शिबिर एक महिन्याच्या कालावधीसाठी आयोजित केले आहे. अफगाणच्या राष्ट्रीय संघाचा दर्जा सुधारण्यासाठी त्यांच्या फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागात क्रिकेटपटूंना कसून सराव करावा लागेल, असे अफगाण क्रिकेट मंडळाच्या प्रवक्त्याने सांगितले. कोरोना परिस्थिती अफगाणमध्ये आटोक्मयात आली असून खबरदारीचे सर्व नियम काटेकोरपणे या शिबिरावेळी अंमलात आणले जात आहेत. सोशल डिस्टन्सिंग राखले जाते. यापूर्वी अफगाण संघाने सराव करण्याचे ठरविले होते. पण कोरोनाच्या संकटामुळे तब्बल तीन महिन्यांच्या कालावधीत क्रिकेटपटूंना आपल्या निवासस्थानी रहावे लागले होते. अफगाण संघाचा 21 नोव्हेंबर रोजी एकमेव कसोटी सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थ येथे खेळविला जाणार आहे.

अफगाण संघ- असगर अफगाण (कर्णधार), आर. गुरबाज, हजरतुल्ला झेझाई, करीम जेनत, मोहम्मद नबी, नजिबुल झेझरान, गुलबदिन नईम, रशिद खान, नवीन उल हक, शापूर झेद्रान, क्वेस अहमद, मुजीब उर रेहमान, अझमतुल्ला उमरझाई, समीउल्ला शेनवारी, उस्मान घनी, मोहम्मद शेहजाद, सय्यद शिरजाद, डी. रसुली, झहीर खान पख्तीन, फरीद मलिक, हमझा होटक आणि एस. अश्रफ.

Related Stories

भारतासाठी आज अस्तित्वाची लढत

Patil_p

सचिन पहिल्या मारुती 800 कारच्या शोधात!

Patil_p

चेन्नईन एफसीकडून एफसी गोवाचा 2-1 गोलानी पराभव

Patil_p

प्राग्वे टेनिस स्पर्धेतील भारताचे आव्हान समाप्त

Patil_p

फुटबॉलपटूंकडून ओडिशा शासनाचे कौतुक

Patil_p

टाटा ओपन स्पर्धेत दुहेरीत लिअँडर पेस, मॅथ्यू एबडन यांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

Patil_p
error: Content is protected !!