तरुण भारत

स्मार्ट रस्त्याच्या काँक्रिटीकरणात गायब झाले चेंबर

प्रतिनिधी/ बेळगाव

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. मात्र, या रस्त्यावर ठिकठिकाणी असलेल्या डेनेज चेंबरवर काँक्रीट घालण्यात येत आहे. महात्मा फुले रोडवरील डेनेज चेंबर तुंबल्याने आता डेनेज चेंबर शोधण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. यामुळे वर्षाच्या आतच काँक्रीटच्या रस्त्यांची तोडफोड करण्यात आल्याने स्मार्ट सिटीच्या गलथान कारभाराचा नमुना चव्हाटय़ावर आला आहे.

Advertisements

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहर व उपनगरांतील रस्ते स्मार्ट बनविण्यात येत आहेत. टिळकवाडी परिसरातील काँग्रेस रोड, शुक्रवार पेठ तसेच महात्मा फुले रोड रस्त्यावर काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. यापैकी काँगेस रोडच्या काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. या ठिकाणी डेनेज वाहिन्या घालण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा जागा सोडण्यात आली आहे. यामुळे आता जलवाहिन्या घालण्याचे काम हाती घेण्यात आले असून या रस्त्यावर आता पुन्हा अडथळय़ाची मालिका सुरू आहे. महात्मा फुले रोड आणि शुक्रवार पेठ येथे संपूर्ण रस्त्यावर काँक्रीट घालण्यात आले आहे. येथील डेनेज चेंबरही काँक्रीट घालून बंद करण्यात आले आहेत. यामुळे नव्याने डेनेजची जोडणी किंवा डेनेज वाहिनी तुंबल्यास काय करायचे, असा मुद्दा उपस्थित झाला आहे. डेनेज चेंबर असलेल्या ठिकाणी काँक्रिटीकरण न करता जागा सोडणे आवश्यक होते. पण याकडे स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱयांनी दुर्लक्ष केले आहे. डेनेज चेंबर असलेल्या ठिकाणी काँक्रीट घालू नये असे पत्र महापालिकेकडून स्मार्ट सिटी कंपनीला देण्यात आले होते. मात्र, याची दखल घेण्यात आली नाही. डेनेज वाहिन्या किंवा डेनेज चेंबर तुंबल्यास लाखो रुपये खर्चून करण्यात आलेले रस्ते फोडावे लागणार आहेत. यामुळे डेनेज चेंबर किंवा पाणीपुरवठय़ाचे व्हॉल्व, मोबाईल केबलचे चेंबर आदी ठिकाणी काँक्रीट घालू नये, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, याची दखल घेण्यात आली नाही. यामुळे तुंबलेल्या ड्रेनेज वाहिन्यांची दुरुस्ती करण्यासाठी रस्त्यावरील काँक्रिटीकरणात गाडलेले डेनेज चेंबर शोधण्यासाठी काँक्रिटीकरण करण्यात आलेला रस्त्याची तोडफोड करण्यात आली आहे. यामुळे स्मार्ट रोडच्या नावाखाली घालण्यात आलेला निधी अयोग्य नियोजनामुळे पाण्यात गेला आहे.

वर्षाच्या आतच महात्मा फुले रोड परिसरात डेनेजची समस्या निर्माण झाली असून सहा महिन्यांपासून डेनेज तुंबल्याने नागरिकांना अडचणांचा सामना करावा लागत आहे. याबाबत महात्मा फुले रोडवरील नागरिकांनी महापालिकेकडे तक्रार केली असता रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आल्याने रस्ता फोडता येत नाही. स्मार्ट सिटी कंपनीने परवानगी दिल्यानंतरच रस्ता फोडून डेनेजची दुरुस्ती करू, असे महापालिकेच्या अधिकाऱयांनी सांगितले होते. पण डेनेज वाहिनी तुंबल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. नागरिकांचे आरोग्य धोक्मयात आल्याने याबाबत मनपाकडे तक्रार करण्यात आल्याने आता तुंबलेल्या ड्रेनेज वाहिन्यांची दुरुस्ती करण्यासाठी रस्त्यांवरील काँक्रिटीकरणात गाडलेले डेनेज चेंबर शोधण्याची वेळ आली आहे. त्यामुळे डेनेज चेंबर काढण्यासाठी काँक्रिटीकरण करण्यात आलेला रस्त्याची तोडफोड करण्यात आली आहे. डेनेज चेंबरची उंची वाढविण्यात येणार आहे. पंधरा दिवसांपूर्वी डेनेज चेंबर खोदण्यात आले आहे. पण याची दुरुस्ती करण्यात आली नाही. सध्या पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनधारकांना धोकादायक बनले आहे. डेनेज चेंबरचे खड्डे असल्याचे लक्षात येत नसल्याने रात्रीच्या वेळी अपघात होत आहेत. यामुळे धोकादायक खड्डे बुजविण्यासाठी डेनेज चेंबरची उंची वाढविण्याचे काम तातडीने करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. 

Related Stories

वडगाव, अनगोळ परिसरात उद्या वीजपुरवठा खंडित

Amit Kulkarni

मनपात आठ कनिष्ठ अभियंत्यांची नियुक्ती

Amit Kulkarni

तालुक्मयाच्या विविध गावांमध्ये यात्रा उत्साहात

Omkar B

नियम पायदळी तुडवून लसीकरणासाठी गर्दी

Amit Kulkarni

हुबळी विभागीय रेल्वेला मालवाहतुकीतून मोठे उत्पन्न

Amit Kulkarni

चिकोडीत वॉर्डनिहाय कोरोना लसीकरण

Patil_p
error: Content is protected !!