तरुण भारत

सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल – डिझेलच्या दरात वाढ; ‘हे’ आहेत नवीन दर

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


देशात सलग दुसऱ्या दिवशी देखील म्हणजेच सोमवारी पुन्हा एकदा पेट्रोल – डिझेलच्या दरात 60 पैसे वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दिल्लीत पेट्रोलची किंमत 71.68 रुपयांवरून 72.46 रुपये प्रति लिटर इतकी झाली आहे. तर डिझेलची किंमत 69.99 रुपयांवरून 70.59 रुपये झाली आहे. 

Advertisements


मुंबईकरांना देखील दर वाढीचे चटके सहन करावे लागणार आहेत. मुंबईत आज पुन्हा पेट्रोल 58 पैशांनी वाढले आहे. त्यामुळे मुंबईकरांना पेट्रोलसाठी 79.49 रुपये मोजावे लागणार आहेत. तर डिझेल दर प्रति लिटर 69.37 रुपये झाला आहे. 


या बरोबरच कोलकाता आणि चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलसाठी अनुक्रमे 74.46 आणि 76.60 मोजावे लागणार आहेत. तर डिझेलची किंमत अनुक्रमे 66.71 व 69.25 इतकी करण्यात आली आहे.

अशा प्रकारे दररोज पेट्रोल – डिझेलच्या किंमती बदलत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता कोरोना संकटाबरोबरच सामान्यांना महागाईचा झळ सहन करावी लागणार आहे. 

Related Stories

केरळमध्ये वेगाने होतेय रिकव्हरी

Patil_p

स्वॅब तपासणीसाठी येणाऱयांचे आधार, ओटीपी क्रमांक घ्या

Patil_p

हाथरसच्या नावाखाली जातीय दंगलीचा कट

Patil_p

अत्याधुनिक ११८ रणगाडे सेनेला अर्पण

Patil_p

अहंकारी केंद्र सरकारला चांगल्या सूचनांची अ‍ॅलर्जी

Abhijeet Shinde

कर्नाटकात गेल्या २४ तासात १,०६५ नवीन रुग्ण, तर २८ मृत्यू

Abhijeet Shinde
error: Content is protected !!