तरुण भारत

मुरगाव पोलिसांकडून चोरीचा छडा, चौघांना अटक

प्रतिनिधी / वास्को

मुरगाव पोलीस स्थानक हद्दीत काही दिवसांपूर्वी झालेल्या 1 लाख 40 हजार किमतीच्या सोन्याच्या ऐवजाच्या चोरीचा छडा लावण्यास पोलिसांना यश आले. मुरगाव पोलिसांनी या चोरी प्रकरणी एका चोरटय़ासह अन्य तिघांना अटक केली आहे. या चोरीत दोघा अल्पवयीन मुलांचाही वापर झाला होता.

Advertisements

   मुरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी सुधीर कुलकर्णी या व्यक्तीने पोलीस तक्रार केली होती. कुलकर्णी हे वास्को सडा मार्गावरील सिने एलमोंत जवळील सुशिला सदन या इमारतीत राहात असून मागच्या महिन्यापासून जवळपास एक महिना ते घरात नव्हते. शनिवारी ते घरी परतले असता, त्यांना आपल्या घरात चोरी झाल्याचे समजले. त्यामुळे त्यांनी यासंबंधी पोलीस तक्रार केली. पोलिसांनी लागलीच संशयीत चोरटय़ांचा शोध घेण्यास प्रारंभ केला असता त्यांना हेडलॅण्ड सडय़ावरील एका युवकाबाबत संशय आला. त्यामुळे पोलिसांनी त्याला गजाआड केले. त्याचे नाव विकास जैस्वाल असे असून या चोरीसाठी त्याने दोघा अल्पवयीन मुलांचाही वापर केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली.

   सदर चोरटय़ाने त्या इमारतीतील घरात प्रवेश करून कपाट फोडले व आतील सोन साखळी, कंठहार व इतर सोन्याचे दागिने मिळून 1 लाख 40 हजारांचा ऐवज लंपास केला. या चोरीच्या ऐवजापैकी आतापर्यंत या चोरटय़ाकडून सोन साखळी हस्तगत करण्यास यश आले आहे. सदर चोरटय़ाने चोरीचा ऐवज अन्य काहींना विकला होता. त्यांची नावे बाशिद शेख, पुनित बाणावलीकर, शिवाप्पा शिरोळ अशी आहेत. पोलिसांनी त्यानाही अटक केली आहे. या चोरी प्रकरणी पोलीस निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मळीक तसेच हवालदार अजित परब अधिक तपास करीत आहेत.

Related Stories

पर्वरीतील सर्व्हिस रोडची साफसफाई मोहीम

Patil_p

पायलट, टॅक्सी, रिक्षाचालकांना योजना राबवावी

Patil_p

चंदीगढ महापालिका निवडणुकीत ‘आप’चा 14 जागांवर विजय

Amit Kulkarni

ईस्ट बंगालचा जमशेदपूरवर धक्कादायक विजय

Amit Kulkarni

मुंबईत अडचणीच्या ठिकाणी आग विझवण्यासाठी लवकरच फायर बाईक

Abhijeet Shinde

गोवा भूमिपुत्र अधिकारणी विधेयक मंजूर

Amit Kulkarni
error: Content is protected !!