तरुण भारत

मांगोरहिलमध्ये सेवा बजावणाऱयांना कोरोना

दोन दिवसात 100 व्हेंटिलेटर उपलब्ध होणार : आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची माहिती

प्रतिनिधी / पणजी

Advertisements

येत्या दोन दिवसात आणखी 100 व्हेंटिलेटर येणार असल्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन चर्चा केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मांगोरहिल वास्कोतील चाचण्या थांबवल्या आहेत, कारण तेथे सेवा बजावणाऱया कर्मचाऱयांनाही लागण झाली आहे, असेही ते म्हणाले.

ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे ते सर्व रुग्ण चांगल्या स्थितीत असून गोव्यातील रुग्णांचे कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण खूप चांगले आहे. देशभराचा आढावा घेतल्यास गोव्याची कामगिरी खूप चांगली आहे. आणखी नव्याने कोविड इस्पितळ स्थापन करण्याची तुर्त गरज नसल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यंमत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. सरकारचे पूर्णपणे त्यावर लक्ष केंद्रीत केले असून गोव्यातील जनतेने घाबरण्याचे कारण नाही. सरकार योग्य पद्धतीने काम करीत असून आवश्यक ती पावले उचलली जात आहेत.

वास्को मांगोरहील येथे काम करणारे कर्मचारी बाधीत झाल्याने येथील चाचण्या थांबविण्यात आल्या होत्या. आवश्यक ती सर्व सामग्री उपलब्ध आहे. कर्मचारीही पाठविले जातात. त्यामुळे चाचण्या सुरू राहणार असल्याचे ते म्हणाले. 200 व्हेंटिलेटरची ऑर्डर दिली आहे. पैकी 100 व्हेंटिलेटर येत्या दोन दिवसात येतील. सध्या 70 व्हेंटिलेटर उपलब्ध असल्याचे मंत्री राणे यांनी सांगितले. रुग्णांचे स्वॅब घेण्यासाठी आवश्यक तो कीट साठा उपलब्ध आहे. गरज भासल्यास इस्पितळातील बेडची संख्या वाढविली जाणार आहे. कळंगुटला जी माहिला सापडली होती तिची स्थिती आता चांगली आहे. त्याचबरोबर तिच्या संपर्कात आलेल्यांविषयीही काळजी घेण्यात आली आहे, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.

Related Stories

लोकायुक्त, गृहकर्ज विधेयके 23 विरुद्ध 7 मतांनी संमत

Amit Kulkarni

पोळे ते माशेपर्यंतच्या रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण गेले वाहून

Amit Kulkarni

काले येथे रेल्वेच्या धडकेने बिबटय़ा दगावला

Amit Kulkarni

कोरोनामुळे सलग दुसऱया वर्षीही चिखलकाल्याचा आनंद भाविकांना मुकला

Amit Kulkarni

आमदार अपात्रता याचिकेवर सभापतीने लवकर निर्णय घ्यावा

Patil_p

मुरगावचे माजी नगराध्यक्ष नंदादीप राऊत व नगरसेविका प्रीया राऊत यांचा कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश

Amit Kulkarni
error: Content is protected !!